ICC World Cup 2019 : क्रिकेट म्हणजे सर्वांना जोडणारा खेळ, सांगतेय नोबेल पारितोषिक विजेती मलाला

सध्याच्या घडीला भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकात खेळावे की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:49 PM2019-05-30T15:49:30+5:302019-05-30T15:50:50+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: Cricket is the game that connects everyone, tells the Nobel prize winner Malala Yousafzai | ICC World Cup 2019 : क्रिकेट म्हणजे सर्वांना जोडणारा खेळ, सांगतेय नोबेल पारितोषिक विजेती मलाला

ICC World Cup 2019 : क्रिकेट म्हणजे सर्वांना जोडणारा खेळ, सांगतेय नोबेल पारितोषिक विजेती मलाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू. पण त्यांना जोडणारा मार्ग हा क्रिकेटच्या 22 यार्डामधून जातो, असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकात खेळावे की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. पण क्रिकेट हा सर्वांना जोडणारा खेळ आहे, असे वक्तव्य नोबेल पारितोषिक विजेती मलाला हिने लंडनमध्ये केले आहे.

विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला लंडनच्या राजवाड्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी इंग्लंडच्या राणीने सर्व संघातील कर्णधारांची भेट घेतली. यावेळी नोबेल पारितोषिक विजेती मलालादेखील तिथे होती. खासकरून तिला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.

या कार्यक्रमानंतर मलाला म्हणाली की, " लहानपणी मीदेखील माझ्या घरच्यांबरोबर क्रिकेट खेळायची. त्यानंतर कॉलेजमध्येही मी क्रिकेट खेळली आहे. क्रिकेट हा एक असा खेळ आहे की जो सर्वांना एका छताखाली आणतो. हा खेळ सर्वांना जोडणारा आहे."


Web Title: ICC World Cup 2019: Cricket is the game that connects everyone, tells the Nobel prize winner Malala Yousafzai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.