लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू. पण त्यांना जोडणारा मार्ग हा क्रिकेटच्या 22 यार्डामधून जातो, असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला भारताने पाकिस्तानबरोबर विश्वचषकात खेळावे की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. पण क्रिकेट हा सर्वांना जोडणारा खेळ आहे, असे वक्तव्य नोबेल पारितोषिक विजेती मलाला हिने लंडनमध्ये केले आहे.
विश्वचषकाच्या पूर्वसंध्येला लंडनच्या राजवाड्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी इंग्लंडच्या राणीने सर्व संघातील कर्णधारांची भेट घेतली. यावेळी नोबेल पारितोषिक विजेती मलालादेखील तिथे होती. खासकरून तिला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.
या कार्यक्रमानंतर मलाला म्हणाली की, " लहानपणी मीदेखील माझ्या घरच्यांबरोबर क्रिकेट खेळायची. त्यानंतर कॉलेजमध्येही मी क्रिकेट खेळली आहे. क्रिकेट हा एक असा खेळ आहे की जो सर्वांना एका छताखाली आणतो. हा खेळ सर्वांना जोडणारा आहे."