ICC World Cup 2019 : श्रीलंकेच्या करूणारत्नेचा 'पराक्रम'; अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 03:30 PM2019-06-28T15:30:25+5:302019-06-28T15:37:58+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Dimuth Karunaratne is a first asian captain to bag goldan duck in World cup | ICC World Cup 2019 : श्रीलंकेच्या करूणारत्नेचा 'पराक्रम'; अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार

ICC World Cup 2019 : श्रीलंकेच्या करूणारत्नेचा 'पराक्रम'; अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेस्टर-ले-स्ट्रीट, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेला साजेशी सुरूवात करता आली नाही. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कागिसो रबाडाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्याने सलामीवीर व कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( 0) याला फॅफ ड्यू प्लेसिसकरवी झेलबाद केले. करुणारत्ने शून्यावर बाद होऊनही एक पराक्रम करून गेला.

रबाडाने टाकलेल्या चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलेल्या करुणारत्नेने पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. शिवाय गोल्डन डक नावावर करणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी आशियातील एकाही कर्णधारावर अशी नामुष्की ओढावलेली नाही. 



सध्याच्या गुणतक्त्यानुसार ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत आपले स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत. भारताचे तीन सामने शिल्लक आहेत आणि ते 11 गुणांसह दुसऱ्या, तर यजमान इंग्लंड 7 सामन्यांत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडला नमवून 7 सात सामन्यांत 7 गुणांसह सहाव्या स्थानी आगेकूच केली आहे.  


श्रीलंकेविरुद्ध रबाडानेही एक विक्रम नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी शॉन पोलॉकने तीनवेळा ही विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने दोनवेळा अॅडम गिलख्रिस्टला, तर एकवेळा फिलो बॅलेसला बाद केले आहे.

Web Title: ICC World Cup 2019 : Dimuth Karunaratne is a first asian captain to bag goldan duck in World cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.