- सुनील गावसकरनिराशाजनक कामगिरीच्या गर्तेत सापडलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध छाप सोडण्यास न्यूझीलंड संघ सज्ज झाला आहे. हे क्रिकेट आहे आणि यात काहीही घडू शकते, विशेषत: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. गेल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचे उट्टे काढण्यास दक्षिण आफ्रिका संघ उत्सुक आहे.केवळ सुरुवातींच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका संघाच्या विश्वचषक मोहिमेला खीळ बसली असे नाही, तर डिव्हिलियर्सचा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याच्या प्रस्तावाचा वादही त्यासाठी कारणीभूत ठरला. आयपीएल २०१८ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या डिव्हिलियर्सने विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडण्याच्या पूर्वसंध्येला संघात खेळण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. व्यक्तीपेक्षा खेळ मोठा असल्याचे सिद्ध करताना हा प्रस्ताव निवड समितीने फेटाळला. पण, डिव्हिलियर्सचा प्रस्ताव प्रसार माध्यमांचा मथळा झाला आणि त्याचा प्रभाव दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीवर पडला.दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी बहरलीच नाही आणि इंग्लंडमधील वातावरण व खेळपट्ट्या त्यांच्यासाठी अनुकूल ठरल्या नाहीत. त्याचप्रमाणे गोलंदाजांकडूनही त्यांना आवश्यक सहकार्य लाभले नाही. जोफ्रा आर्चरचा आखूड टप्प्याचा चेंडू हेल्मेटवर आदळल्याच्या धक्क्यातून हाशिम अमला अद्याप सावरल्याचे दिसत नाही. अमलासारखा अव्वल फलंदाज सध्याचा घडीला चाचपडत असल्याचे चित्र वाईट आहे. बाऊन्सर केवळ डॉट बॉल नसून बळी घेण्याचे अस्त्र म्हणून उपयुक्त ठरत आहे. फ्रंट फूटवर खेळणारे अनेक फलंदाज आखूड टप्प्याच्या माऱ्यावर अडचणीत येत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही पंच बाऊन्सरबाबत निर्णय घेताना गोलंदाजांना झुकते माप देत असतात. त्यामुळे गोलंदाजांना एकाच षटकात तीन-चार आखूड टप्प्याचे चेंडू टाकण्याची मुभा मिळते. काही पंच मात्र फलंदाजांच्या हेल्मेटच्या वरुन गेलेला चेंडू वाईड ठरवत आहेत. जर गोलंदाजांचा चेंडू खेळपट्टीवरील पांढºया रंगाच्या मार्किंगमधील मर्यादेत नसेल तर वाईड ठरविला जातो त्याचप्रमाणे बाऊन्सरबाबतही काही मर्यादा असायला हवी.न्यूझीलंडने बाऊन्सरचा अधिक वापर केलेला नाही. बोल्ट व हेन्री हे वेगाने मारा करीत चेंडू स्विंग करण्यास सक्षम आहेत. विशेषत: बोल्ट सुरुवातीच्या षटकात उजव्या हाताने खेळणाºया फलंदाजासाठी चेंडू आतमध्ये आणण्यात माहीर आहे. नीशामच्या रुपाने न्यूझीलंडकडे चांगला अष्टपैलू आहे. तो काही षटके गोलंदाजी करीत आक्रमक फलंदाजी करण्यास सक्षम आहे. कर्णधार विलियम्सन व रॉस टेलर यांच्यामुळे न्यूझीलंडची फलंदाजी बळकट आहे. सुरुवातीच्या सामन्यांनंतर स्पर्धेतील दावेदार संघ म्हणून ऑस्ट्रेलिया, भारत व इंग्लंड यांचा बोलबाला असल्यानंतरही दोन्ही संघांवर चाहत्यांचे लक्ष असून ही बाब न्यूझीलंडसाठी विशेष अनुकूल आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019: ‘एबी’चा तो वादही आफ्रिकेसाठी ठरला निराशाजनक
ICC World Cup 2019: ‘एबी’चा तो वादही आफ्रिकेसाठी ठरला निराशाजनक
केवळ सुरुवातींच्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका संघाच्या विश्वचषक मोहिमेला खीळ बसली असे नाही, तर डिव्हिलियर्सचा विश्वचषक स्पर्धेत खेळण्याच्या प्रस्तावाचा वादही त्यासाठी कारणीभूत ठरला.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 2:19 AM