कार्डीफ, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने 386 धावांचा डोंगर उभा करत बांगलादेशविरुद्ध निम्मी लढाई जिंकली होती. त्यांच्या गोलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी करताना बांगलादेशला 280 धावांपर्यंतच रोखले. जेसन रॉयच्या 153 धावा आणि जॉनी बेअरस्टो ( 51), जोस बटलर (65) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या उभी केली. बांगलादेशच्या शकिब अल हसनने शतकी खेळी करून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, त्याला अपयश आले. बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड यांनी बांगलादेशला जोरदार धक्के देत विजयात खारीचा वाटा उचलला.
जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले. इंग्लंडने शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153 धावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
शतकाच्या आनंदात जेसन रॉयनं पंचांना मारली ढुशी, Video
रॉय-बेअरस्टो जोडीनं मोडला 16 वर्षांपूर्वीचा विक्रम, रॉयच्या 153 धावा
इंग्लंडचा भीमपराक्रम, टीम इंडियाच्या नावावरील मोडला विक्रम
बांगलादेशला धु धु धुतलं, पण फिल्डींगसाठी 'तो' मैदानावर आलाच नाही; इंग्लंडला धक्का!
बांगलादेशविरुद्ध इंग्लंडनं केली विक्रमांची आतषबाजी; जाणून घ्या कशी
बाबो... एकाच चेंडूवर बेल्सही उडाल्या अन् षटकारही गेला, पाहा कसा तो?
वर्ल्ड कपमध्ये वेगाचा बादशाह कोण, 153kph वेगानं कोणी टाकला चेंडू?