लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडची वाटचाल अवघड झाली आहे. त्यात उर्वरित तीन सामन्यांत त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत व न्यूझीलंड या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करायचा आहे. अशाच इंग्लंडला आणखी एक पराभव महागात पडू शकतो. त्यांच्या याच चिंतेत भर घालणारे वृत्त धडकले आहे. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय दुखापतीतून सावरला आहे, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत त्याला खेळता येणार नाही.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या जेसनच्या अनुपस्थितीचा फटका श्रीलंकेविरुद्ध यजमानांना बसला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर तो मैदानावर परतला नाही. त्यानंतर अफगाणिस्तान व श्रीलंका अशा दोन सामन्यांना त्याला मुकावे लागले आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही तो खेळणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. अद्याप इंग्लंड क्रिकेट मंडळाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नसला तरी रॉय कांगारूंविरोधात खेळणार नसल्याचे सूत्रांकडून कळत आहे.
रॉयने तीन डावांत 71.66 च्या सरासरीनं 215 धावा केल्या आहेत. त्यात बांगलादेशविरुद्धच्या 153 धावांच्या खेळीचा समावेश आहे.
Web Title: ICC World Cup 2019, England vs Australia : Jason Roy to miss the match against Australia.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.