लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेसन रॉय, जो रूट, इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 311 धावा करता आल्या.
विशवचषकात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर त्यांना जॉनी बेअरस्टोवला शून्यावर गमवावे लागले. पण त्यानंतर जो रूट आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी रचली आणि संघाला स्थैय मिळवून दिले. पण हे दोघेही फक्त पाच धावांमध्ये बाद झाले आणि इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले. यावेळी रूटने 51 आणि रॉयने 54 धावांची खेळी साकारली.
इंग्लंडचा संघ पुन्हा अडचणीत सापडला असताना कर्णधार इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी रचत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. मॉर्गनने 57 धावांची खेळी साकारली. मॉर्गन बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर त्यांनी ठराविक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. स्टोक्सनेही यावेळी 89 धावांची खेळी साकारली.