Join us  

ICC World Cup 2019 ENGvSA : इंग्लंडच्या कर्णधाराचा पराक्रम, मैदानावर उतरताच नोंदवला विक्रम

ICC World Cup 2019 ENGvSA : पहिला सामना अशा दोन संघांमध्ये होत आहे की, ज्यांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 2:59 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पहिला सामना अशा दोन संघांमध्ये होत आहे की, ज्यांनी आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकलेला नाही. क्रिकेट हा खेळ विश्वाला ज्यांनी शिकवला तो इंग्लंडचा संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. पण आतापर्यंत या दोन्ही देशांना एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यांमध्ये आतापर्यंत 59 सामने खेळवले गेले आहेत. यापैकी 29 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत, तर इंग्लंडला 26 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहेत. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर तीन सामन्यांचे निकाल लागलेले नाहीत. 

सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमानांना फलंदाजीचा आमंत्रण दिले. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानावर पाऊल ठेवताच इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने विक्रमाची नोंद केली. इंग्लंडकडून सर्वाधिक 200 सामने खेळण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. 2006 मध्ये त्याने आयर्लंड संघाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आयर्लंडसाठी 23 सामन्यांत 744 धावा केल्या. त्यात 1 शतक व पाच अर्धशतकाचा समावेश होता. इंग्लंडकडून आजचा त्याचा हा 200 वा सामना आहे. त्याने 199 सामन्यांत 40.21 च्या सरासरीनं 6233 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकं व 40 अर्धशतकाचा समावेश आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडद. आफ्रिका