मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : उपांत्य फेरीच्या लढतीतील त्या 30 मिनिटांनी भारतीय संघाचे भविष्यच बदलून टाकले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीनही खेळाडू अवघ्या 5 धावांत तंबूत परतले. महेंद्रसिंग धोनी व रवींद्र जडेजा यांनी संघर्ष केला, परंतु भारताला 18 धावांनी हार मानावी लागली. 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत तंबूत परतला. या सामन्यात ज्याच्याकडून सर्वाधिक अपेक्षा होती तो रोहित शर्मा अवघ्या एका धावेवर माघारी परतला. रोहितनंही त्या सामन्यात आलेल्या अपयशाची खंत सोशल मीडियावर व्यक्त केली.
धोनीला चौथ्या क्रमांकावर न पाठवण्यामागे होतं हे कारण, शास्त्रींचा खुलासा
रोहितसह लोकेश राहुल व कर्णधार विराट कोहली यांनाही प्रत्येकी एक धावच करता आणि संघाची अवस्था 3 बाद 5 अशी दयनीय झाली होती. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सातव्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण, त्यांना 18 धावांनी अपयश आले. पराभवानंतर ड्रेसिंग रुमच्या इथे उभ्या असलेला रोहितचा निराश फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
वर्ल्ड कप स्पर्धा आता आयपीएल फॉरमॅटमध्ये खेळवा, विराट कोहलीचा पर्याय
या सामन्यानंतर रोहितनं ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला,''संघाला जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हाच आम्हाला अपयश आलं. 30 मिनिटांच्या त्या अपयशानं आमच्या हातून जेतेपदाचा चषक उंचावण्याची संधी हिसकावून घेतली. माझं मन जाणतंय की किती वेदना होत आहेत ते, तुम्हालाही तशा होत असतील. संपूर्ण स्पर्धेत तुम्ही दिलेला पाठिंबा अविश्वसनीय होता. सर्वांचे आभार.''
अन् सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्यात रोहित शर्माला अपयश
रोहित शर्माला महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडण्याची संधी होती, परंतु तेंडुलकरचा तो विक्रम अबाधित राहिला आहे. किवींविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहितने 8 सामन्यांत 92.42 च्या सरासरीने 647 धावा केल्या होत्या. त्याला एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी केवळ 27 धावांची गरज होती. मात्र, उपांत्य फेरीत रोहित एक धाव करून माघारी परतला. भारताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे रोहितची विश्वविक्रमाची संधी हुकली.
टीम इंडिया 'फायनल' बघूनच मायदेशी येणार, कारण...
तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेत 2003 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यांत 61.18 च्या सरासरीने 673 धावा केल्या होत्या. तेव्हापासून एका वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर कायम आहे. रोहितने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच शतके झळकावली असून हाही एक विक्रम आहे. रोहित आता वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतक नोंदवण्याचा सचिनचा विक्रम मोडण्याच्या स्थितीत होता. पण, त्याला 9 सामन्यात 648 धावांवर समाधान मानावे लागले.
Web Title: ICC World Cup 2019 : Failed to deliver as a team when it mattered: Rohit Sharma on World Cup semi-final defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.