ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : सध्या भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे ते सलामीवीर शिखर धवनवर. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्यानंतर धवन विश्वचषकामध्ये खेळू शकत नाही, अशा अफवा पसरल्या होत्या. पण भारतीयांसाठी एक गूड न्यूज आली असून धवन 10 दिवसांमध्ये फिट होऊ शकतो.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये गुरुवारी विश्वचषकातील सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आले होते. यावेळी बांगर यांनी ही माहिती दिली.
याबाबत बांगर म्हणाले की, " आम्ही धवनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. धवनच्या दुखापत लवकर बरी होईल, अशी आम्हाला आशा आहे. धवन 10-12 दिवसांमध्ये फिट होईल, असे आम्हाला वाटते. रिषभ पंत मँचेस्टर येथे काही वेळात दाखल होणार आहे."
थांबायचं नाय गड्या, घाबरायचं नाय; दुखापतीनंतर 'गब्बर'ची भावनिक पोस्टभारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. त्यामुळे बांगलादेश ( 2 जुलै) किंवा श्रीलंका ( 6 जुलै) यांच्याविरुद्ध सामन्यापर्यंत धवन खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, याची शक्यता कमीच आहे. या दुखापतीमुळे खचून न जाता धवननं पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक भावनिक कविता पोस्ट केली आहे.दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला काही दिवस संघाबाहेर राहावे लागणार आहे. त्याच्या हाताचा स्कॅन केल्यानंतर ती दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर धवनला पुढील तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीमध्ये लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. धवन या दुखापतीनंतर खचला नाही. त्यानं दमदार कमबॅक करण्याचा निर्धार कवितेच्या वाटे व्यक्त केला आहे.