Join us  

ICC World Cup 2019 : गुप्टील, टेलर यांना धावा काढाव्याच लागतील

आॅस्ट्रेलिया संघाने शानदार पकड निर्माण केली आहे. विश्वचषकात त्यांच्या खेळाचा अंदाज निराळाच वाटतो. ज्या आॅस्ट्रेलियाला आम्ही ओळखतो तो हाच संघ आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 3:58 AM

Open in App

- हर्षा भोगलेआॅस्ट्रेलिया संघाने शानदार पकड निर्माण केली आहे. विश्वचषकात त्यांच्या खेळाचा अंदाज निराळाच वाटतो. ज्या आॅस्ट्रेलियाला आम्ही ओळखतो तो हाच संघ आहे. न्यूझीलंड संघ रस्ता चुकल्यासारखा वाटतो. वरिष्ठ खेळाडू लय मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. न्यूझीलंड संघ चॅम्पियन्ससारखा दिसत नाही. आयपीएलसारखी विश्वचषक दीर्घकाळ चालणारी स्पर्धा आहे. तुमची सुरुवात आॅस्ट्रेलियासारखी मंदगती झाली असेलही पण मुसंडी मारून विरोधी संघांना पाठोपाठ धूळ चारू शकता किंवा न्यूझीलंडसारखी धडाक्यात सुरुवात केल्यानंतर अखेरच्या टप्प्यावर मात्र संघर्ष करावा लागू शकतो.न्यूझीलंडला आता सलग दोन अटीतटीचे सामने खेळायचे आहेत. स्पर्धेतील अलिकडची कामगिरी पाहता त्यांच्यादृष्टीने हे आव्हानात्मक असेल. केन विलियम्सनचा अपवाद वगळता अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. गोलंदाजीतही ट्रेंट बोल्ट आणि लोकी फर्ग्युसन यांच्यावर न्यूझीलंड संघ अधिकच विसंबून असतो. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मार्टिन गुप्टील आणि टेलर यांना धावा काढाव्याच लागणार आहेत. शिवाय हेन्री आणि टिम साऊदी यांनादेखील योगदान द्यावे लागेल.आॅस्ट्रेलियाच्या दणदणीत कामगिरीचे श्रेय हजाराहून अधिक धावा काढणारे सलामीवीर अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या झकास फलंदाजीला जाते याची न्यूझीलंडला जाणीव आहे. डेव्हिड वॉर्नर हा लांबलचक स्पर्धेत धावा काढण्यात पटाईत मानला जातो. आयपीएलमध्ये त्याने असेच यश संपादन केले होते. पण आॅस्टेÑलिया संघाच्या जमेची बाजू कर्णधार अ‍ॅरोन फिंचला सूर गवसणे हीच आहे.मिशेल स्टार्क आणि बेहरेनडोर्फ या वेगवान गोलंदाजांचे चेंडू उजव्या फलंदाजांसाठी यष्टिच्या आत येतात. नव्या चेंडूवर आॅस्ट्रेलिया संघाचा मारा भेदक आहे पण त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस यांच्यावर मधल्या षटकांची जबाबदारी असते. न्यूझीलंड संघाने नेमक्या या गोष्टीचा लाभ घेत भराभर धावा काढायला हव्या.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019न्यूझीलंड