ICC World Cup 2019, मँचेस्टर : यंदाच्या विश्वचषकात बऱ्याच खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. या दुखापतीतून ते कधी आणि कसे सावरतात, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. चाहत्यांसाठी एक खूष खबर असून एक सलामीवीर पुढच्या आठवड्यात विश्वचषकातील सामन्यांमध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे.
भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला गेल्या आठवड्यातील मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ऑसीविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर धवनला ही दुखापत झाली होती. मंगळवारी त्याच्या या दुखापतीचा वैद्यकिय अहवाल आला आणि त्याच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्याचे समोर आले. या दुखापतीमुळे खचून न जाता धवननं पुन्हा गगन भरारी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक भावनिक कविता पोस्ट केली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून विश्वचषक स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला काही दिवस संघाबाहेर राहावे लागणार आहे. त्याच्या हाताचा स्कॅन केल्यानंतर ती दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर धवनला पुढील तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. धवनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीमध्ये लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. धवन या दुखापतीनंतर खचला नाही. त्यानं दमदार कमबॅक करण्याचा निर्धार कवितेच्या वाटे व्यक्त केला आहे.
धवनबरोबरच इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयही दुखापत झाली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात जेसनचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे त्याला मैदान सोडून जावे लागले होते.
याबाबत जेसनने सांगितले की," वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात मला दुखापत झाली होती. पण आता मी फिट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मला अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळता येमार नाही. पण पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी मात्र मी नक्कीच फिट असेन." हे वृत्त www.lokmatnews.in वर प्रसारित करण्यात आले होते.