लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आज कसून सराव केला. पण काही दिवसांपूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने एक 'टिक टॉक'चा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता सामन्याला काही तासांचा अवधी आहे, असे त्यानंतरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टवरून पंड्या ट्रोल झाला आहे.
... असाही एक दिवस येईल, हे माहिती नव्हतं, विराटचा व्हिडीओ वायरल
भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारतापुढे न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या लढतीची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. पण या सामन्यापूर्वी एक पत्रकार परिषद झाली. या परिषदेला कोहली उपस्थित होते. त्यावेळी कोहलीला एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कोहलीने, ... असाही एक दिवस येईल, हे माहिती नव्हतं, असं म्हटले आहे.
कोहली आणि विल्यमसन हे दोघेही कर्णधार म्हमून उपांत्य फेरीत तब्बल 11 वर्षांनी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 11 वर्षांपूर्वी 19-वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हे दोन्ही संघ खेळत होते. त्यावेळी कोहली आणि विल्यमसन हेच कर्णधार होते. याबाबत कोहलीला विचारल्यावर तो म्हणाला की, " 11 वर्षांनी दोन्ही देश पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या संघातील खेळाडू आता राष्ट्रीय संघाकडून खेळत आहेत, ही फार चांगली गोष्ट आहे. आम्हा दोघांनाही या गोष्टीचा आनंद आहे. पण असाही दिवस येईल, असे मला कधीही वाटले नव्हते."
विराटचा युवा संघ 2008 मध्ये जिंकला होता, आता काय होणार?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचे संघ प्रत्येकी सातव्यांदा उपांत्य फेरीत पोहाचले आहेत. मात्र या दोन संघांदरम्यान पहिल्यांदाच उपांत्य सामना खेळला जाणार आहे. त्याअर्थाने मंगळवारचा सामना तर विशेष असणारच आहे, शिवाय विराट कोहली व केन विल्यम्सन यांना 11 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाराही हा सामना असणार आहे.
11 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही भारत- न्यूझीलंड अशीच लढत झाली होती. त्यावेळी भारताने तीन गडी राखून विजय मिळवला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार होता केन विल्यमसन आणि आपला कर्णधार होता विराट कोहली. आता हे दोघेही मोठे होवून मोठ्यांच्या संघांचे कर्णधार म्हणून पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्या त्यावेळच्या आठवणी जागणारच आहेत.
भारताचा हा खेळाडू आहे तरी कोण, ओळखा पाहू...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आज कसून सराव केला. या सरावा दरम्यान भारतीय खेळाडूंनी विविध व्यायामप्रकार केले. व्यायाम करत हा भारताचा खेळाडू अशा काही पोझमध्ये होता की, त्याला ओळखणे सोपे जात नव्हते. तुम्हाला तरी हा खेळाडू ओळखता येतोय का...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना जर रद्द झाला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते. पण आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडपेक्षा भारताचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळाले आहे.
Web Title: ICC World Cup 2019: Hardik Pandya Trolley before the semifinals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.