लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान सामना अवघ्या क्रिकेट जगताने पाहिला, पण या सामन्यातील एक गोष्ट जास्त कुणीच पाहिली नाही. या सामन्यात एका भारतीय चाहत्याने एका एका मुलीला सामना सुरु असताना चक्क प्रपोज केलं. त्यावेळी ही मुलगी त्याला काय म्हणाली, ते एका व्हिडीओमध्ये शूट करण्यात आले आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच वायरल होताना दिसत आहे.
भारत आणि पाकिस्तान सामना सुरु असताना एका मुलाने आपल्या खिशातील अंगठी काढली आणि ती एका मुलीसमोर धरली. त्यानंतर या मुलीला त्याने सर्वांसमोर प्रपोज केलं. त्या मुलीला हा मोठा आश्चर्याचा धक्का होता. यावेळी या मुलीने त्या मुलाला चक्क मिठी मारली.
भारत-पाकिस्तान पुन्हा येऊ शकतात आमनेसामने... जाणून घ्या कसे?भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट विश्व आतूर असते. हा सामना जर विश्वचषकातील असेल तर सर्वांचीच नजर या सामन्यावर असते. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने विजयी पंरपरा कायम ठेवली. पण आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ या विश्वचषकात पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येतील, असे म्हटले जात असून त्यामध्ये काही समीकरणेही आहेत.
सध्याच्या घडीला पाकिस्तानचे सहा सामने झाले आहेत. या सहा सामन्यांमध्ये पाकिस्तानचे पाच गुण आहेत. त्यामुळे यापुढे पाकिस्तानचे तीन सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जर पाकिस्तानने जिंकले तर त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवता येऊ शकते. पण त्याचबरोबर जर-तर या गोष्टीही यामध्ये पाहायला मिळत आहेत.
पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचण्याची पहिली शक्यता म्हणजे इंग्लंडचे आता तीन सामने शिल्लक आहेत. इंग्लंडचा संघ जर तिन्ही सामन्यांत पराभूत झाला, तर त्यांचे या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येईल. कारण सध्याच्या घडीला इंग्लंडचे सहा सामन्यांमध्ये आठ गुण आहेत. त्यामुळे जर यापुढील तिन्ही सामने इंग्लंडने गमावले तर त्यांना विश्वचषकातून बाहेर पडावे लागेल.
पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचण्याची दुसरी म्हणजे ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने गमावले तरही पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. कारण सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ 6 सामने खेळला आहे आणि त्यांचे 10 गुण आहेत. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने गमावले तर त्यांचे 10 गुण कायम राहतील. पण दुसरीकडे जर पाकिस्तानच्या संघाने तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे 11 गुण होतील आणि ऑस्ट्रेलियाला मागे सारून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवेल.