लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना बाबरने सचिन, विराट, धोनी यांनाही पिछाडीवर सोडले आहे. नेमका हा पराक्रम आहे तरी काय, जाणून घेऊ या...
बुधवारी (आज) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु होता. या सामन्यात शाहिन आफ्रिदीच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले होते. कारण शाहिनच्या तीन विकेट्समुळे न्यूझीलंडची ५ बाद ८३ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांच्या दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडला २३७ अशी आव्हानात्मक धावसंख्या रचता आली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आशिया खंडातील सर्वात जलद तीन हजार धावा करणारा बाबर हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. हा विक्रम रचताना बाबरने सचिन, कोहली आणि धोनी यांना मागे टाकले आहे. बाबरने ६८ डावांमध्ये तीन हजार धावांचा पल्ला गाठला आहे. या ६८ डावांमध्ये बाबरने ९ शतक आणि १४ अर्धशतके लगावली आहेत. सध्याच्या घडीला बाबर हा ५०च्या सरासरीने धावा करत आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांच्याच अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यांचा अर्धा संघ ८३ धावांमध्येच तंबूत परतला होता. त्यानंतर जेम्स नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी सहाव्या विकेटसाठी १८३ धावांची भागीदारी रचली आणि संघाला दोनशे धावांपर्यंत मजल मारून दिली. या सामन्यात शाहीनचा स्पेल न्यूझीलंडला चांगलाच महागात पडला. कारण शाहीनने कॉलिन मुन्रो, रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांना स्वस्तात तंबूचा रस्ता दाखवला. फॉर्मात असलेल्या केन विल्यम्सनला शादाब खानने माघारी धाडले.
विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम क्रिकेट विश्वात एकेकाळी सर्वाधिक विश्वविक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होते. पण सचिन निवृत्त झाल्यावर त्याचे काही विश्वविक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोडीत काढले आहेत. आता अजून एक सचिनचा विश्वविक्रम कोहलीला खुणावतो आहे. भारताचा उद्या वेस्ट इंडिजबरोबर सामना होणार आहे. या सामन्यात कोहली सचिनचा एक विश्वविक्रम मोडण्यासाठी सज्ज झालेला आहे.
वेस्ट इंडिजबरोबरच्या सामन्यात भारताचेच पारडे जड आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला आणखी एक विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. या सामन्यातून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 20 हजार धावांचा विक्रम नावावर करण्याची संधी आहे आणि त्यासाठी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध ३७ धावांची खेळी करावी लागेल.