लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला 311 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांची मिशन वर्ल्डकपची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने या सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला.
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करता आला नाही. सामन्याच्या सुरुवातीला हशिम आमला दुखापतग्रस्त झाल्यामुळे माघारी परतला. त्यानंतर क्विंटन डीकॉक आणि व्हॅन डर डुसन यांचा अपवाद वगळता फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही. डीकॉकने 68, तर डुसनने 50 धावांची खेळी साकारली.
जेसन रॉय, जो रूट, इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकी खेळीनंतरही इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 311 धावा करता आल्या.
विशवचषकात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर त्यांना जॉनी बेअरस्टोवला शून्यावर गमवावे लागले. पण त्यानंतर जो रूट आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी रचली आणि संघाला स्थैय मिळवून दिले. पण हे दोघेही फक्त पाच धावांमध्ये बाद झाले आणि इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले. यावेळी रूटने 51 आणि रॉयने 54 धावांची खेळी साकारली.
इंग्लंडचा संघ पुन्हा अडचणीत सापडला असताना कर्णधार इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी रचत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. मॉर्गनने 57 धावांची खेळी साकारली. मॉर्गन बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर त्यांनी ठराविक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. स्टोक्सनेही यावेळी 89 धावांची खेळी साकारली.
वर्ल्ड कपच्या इतिहासात इंग्लंडने आज केली 'ही' कमालइंग्लंडच्या जेसन रॉय, जो रूट, इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी पहिल्याच सामन्यात अर्धशतके झळकावली. त्यामुळेच इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 311 धावा करता आल्या. पण आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात जी गोष्ट घडली नाही ती या सामन्यात पाहायला मिळाली.
विशवचषकात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर त्यांना जॉनी बेअरस्टोवला शून्यावर गमवावे लागले. पण त्यानंतर जो रूट आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी रचली आणि संघाला स्थैय मिळवून दिले. पण हे दोघेही फक्त पाच धावांमध्ये बाद झाले आणि इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले. यावेळी रूटने 51 आणि रॉयने 54 धावांची खेळी साकारली.
इंग्लंडचा संघ पुन्हा अडचणीत सापडला असताना कर्णधार इऑन मॉर्गन आणि बेन स्टोक्स यांनी संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी रचत संघाला दोनशे धावांचा पल्ला गाठून दिला. मॉर्गनने 57 धावांची खेळी साकारली. मॉर्गन बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव गडगडल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर त्यांनी ठराविक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले. स्टोक्सनेही यावेळी 89 धावांची खेळी साकारली.
आतापर्यंत इंग्लंडने विश्वचषकातील सामन्यात एकदाही चार अर्धशतके झळकावलेली नाही. यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंनी विश्वचषकात पाच वेळा तीन अर्धशतके झळकावली होती. पण आजच्या सामन्यात पहिल्यांदाच इंग्लंडच्या चार खेळाडूंना अर्धशतके झळकावता आली आहेत.
आतापर्यंत इंग्लंडच्या खेळाडूंनी विश्वचषकात केलेली अर्धशतके पाहा..
-4 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओव्हल, 2019- 3 विरुद्ध भारत, लॉर्ड्स, 1975
-3 विरुद्ध ईस्ट आफ्रिका, एजबेस्टन, 1975
-3 विरुद्ध श्रीलंका, पेशावर, 1987
-3 विरुद्ध पाकिस्तान,कराची, 1996
-3 विरुद्ध आयरलंड, बेंगळुरू, 2011