लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : महेंद्रसिंग धोनी हा एक अनुभवी क्रिकेटपटू, दमदार फलंदाज आणि निष्णात यष्टीरक्षक आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेला (आयसीसी) मात्र धोनीची एक गोष्ट खटकली आहे. आयसीसीने बीसीसीआय धोनीच्या ग्लोव्जवरील एक चिन्ह काढण्याची विनंती केली आहे.
धोनीच्या ग्लोव्जवर असं कोणतं चिन्ह आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. धोनीचे ग्लोव्ज हे हिरव्या रंगाचे आहेत. या ग्लोव्जवर पांढऱ्या रंगात एक चिन्ह आहे. हे चिन्ह भारतीय आर्मीतील असल्याचे म्हटले जात आहे.
आयसीसीने याबाबत म्हटले आहे की, " आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळाडू जे पेहराव परीधान करताता किंवा जी उपकरण वापरतात त्याबाबत काही नियम आहेत. पेहराव आणि उपकरणांवर राजकीय किंवा धार्मिक गोष्टी असू नयेत, असे आम्हाला वाटते. याबाबत आम्ही बीसीसीआयला विनंती केली आहे."