ICC World Cup 2019: धवनऐवजी पंतला खेळवण्याची आयसीसीने दिली बीसीसीआयला परवानगी

आयसीसीने आज रात्री बीसीसीआयची ही विनंती स्वीकारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 11:05 PM2019-06-19T23:05:13+5:302019-06-19T23:06:05+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019: ICC given permission to BCCI | ICC World Cup 2019: धवनऐवजी पंतला खेळवण्याची आयसीसीने दिली बीसीसीआयला परवानगी

ICC World Cup 2019: धवनऐवजी पंतला खेळवण्याची आयसीसीने दिली बीसीसीआयला परवानगी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये विश्वचषक सुरु आहे. विश्वचषक सुरु असताना बीसीसीआयने आज आयसीसीला एक विनंती केली होती. आयसीसीने आज रात्री बीसीसीआयची ही विनंती स्वीकारली आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. पण आज भारतीय संघ व्यवस्थापनाला धवन विश्वचषक खेळू शकणार नाही, हे समजले. त्यामुळे धवन विश्वचषकाला मुकणार, असे भारतीय संघ व्यवस्थापनाने सांगितले. धवनऐवजी रिषभ पंतला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला.

कोणत्याही खेळाडूला संघात घ्यायचे असेल, तर त्याचे कारण आयसीसीला देणे भाग असते. त्याचबरोबर या खेळाडूची खेळण्याची परवानगीही घ्यावी लागते. आज दुपारी बीसीसीआयने रिषभ पंतला खेळवण्याची परवानगी मागितली होती. आयसीसीने आज रात्री या गोष्टीला परवानगी दिली आहे.


विश्वचषकातून बाहेर पडल्यावर धवन झाला भावुक, लिहिला खास संदेश...
अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला विश्वचषकाला मुकावे लागेल. पण ही गोष्ट धवनच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यानंतर धवनने एक भावुक संदेश चाहत्यांसाठी लिहीला आहे.

भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. धवन तीन आठवड्यात दुखापतीतून सावरेल असे सांगण्यात येत होते, परंतु तो सावरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यानं उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. IANSला बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ''धवन वर्ल्ड कप खेळण्यासाठी फिट नसून त्याला रिकव्हर होण्यासाठी दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लागेल. त्यामुळे तो वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेत आहे,'' असे सूत्रांनी स्पष्ट केले.  

आपल्या या पोस्टमध्ये धवनने लिहिले आहे की, " विश्वचषकातून बाहेर पडताना मी फाक भावुक झालो आहे. दुर्देवाने माझ्या अंगठ्याची दुखापत बरी होऊ शकलेली नाही. पण विश्वचषक सुरु राहायलाच हवा. मला संघातील खेळाडूंनी, देशवासियांनी आणि चाहत्यांनी जो पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार. जयहिंद." 


दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्घचे सामने जिंकून वर्ल्ड कप स्पर्धेत जोरदार सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला जबरदस्त धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत घणाघाती शतकी खेळी करणारा डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे धवनला तीन आठवडे संघाबाहेर राहावे लागणार होते, पण आता त्याला स्पर्धेलाच मुकावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या लढतीत शिखर धवनने शानदार शतकी खेळी केली होती. त्याने रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीसमवेत केलेल्या मोठ्या भागीदाऱ्यांमुळे भारतीय संघाला साडेतीनशेपार मजल मारता आली होती. मात्र या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा एक उसळता चेंडू हातावर बसून शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत बळावल्याने तो क्षेत्ररक्षणालाही येऊ शकला नव्हता. 

Web Title: ICC World Cup 2019: ICC given permission to BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.