मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासह विजयी संघाला मालामाल होण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) या स्पर्धेसाठी 10 मिलियन डॉलर ( भारतीय किमतीत जवळपास 70 कोटी) रोख बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले. यापैकी विजेत्या संघाला 4 मिलियन ( 28 कोट) मिळणार आहेत. आतापर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धांमधील दिली जाणारी ही सर्वाधिक रक्कम आहे. हे 10 मिलियन डॉलर बक्षीस रकमेतील दोन मिलियन हे उपविजेत्या, तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 8 लाख डॉलर देण्यात येणार आहेत.
30 मे पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे सामने 11 विविध स्टेडियम्सवर खेळवण्यात येणार आहेत. 46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत. प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळणार असून अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 1992 ची वर्ल्ड कप स्पर्धा या फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली होती आणि त्यात पाकिस्तानने बाजी मारली होती.
यजमान इंग्लंडचा संघ जागतिक वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे आणि जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये ते अव्वल आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. पण, यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघही जेतेपदाचा दावेदार आहे. गेल्या वर्षभरात भारतीय संघाने परदेशात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने मँचेस्टर व बर्मिंगहॅम येथे अनुक्रमे 9 व 11 जुलैला खेळवण्यात येईल. जेतेपदाचा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे.
अब की बार... वर्ल्ड कपमध्ये एका डावात 500 पार!
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत स्कोअर बोर्डमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 400 धावांपर्यंत स्कोअर बोर्डमध्ये स्केल होती. पण आता ही स्केल वाढवून 500 धावांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळेच इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला या वर्ल्ड कपमध्ये पाचशे धावा होतील, असे वाटत आहे. याबाबत इंग्लंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले आहे की, "आम्ही स्कोअर बोर्डची स्केल बदलली आहे. कुणास ठावूक या विश्वचषकात 500 धावांचा इतिहासही रचला जाऊ शकतो."
Web Title: ICC World Cup 2019 : ICC World Cup winner to pocket $4 mn, a total of $10 mn at stake during tournament
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.