मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदासह विजयी संघाला मालामाल होण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) या स्पर्धेसाठी 10 मिलियन डॉलर ( भारतीय किमतीत जवळपास 70 कोटी) रोख बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले. यापैकी विजेत्या संघाला 4 मिलियन ( 28 कोट) मिळणार आहेत. आतापर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धांमधील दिली जाणारी ही सर्वाधिक रक्कम आहे. हे 10 मिलियन डॉलर बक्षीस रकमेतील दोन मिलियन हे उपविजेत्या, तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 8 लाख डॉलर देण्यात येणार आहेत.
अब की बार... वर्ल्ड कपमध्ये एका डावात 500 पार!यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत स्कोअर बोर्डमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 400 धावांपर्यंत स्कोअर बोर्डमध्ये स्केल होती. पण आता ही स्केल वाढवून 500 धावांपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळेच इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला या वर्ल्ड कपमध्ये पाचशे धावा होतील, असे वाटत आहे. याबाबत इंग्लंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सांगितले आहे की, "आम्ही स्कोअर बोर्डची स्केल बदलली आहे. कुणास ठावूक या विश्वचषकात 500 धावांचा इतिहासही रचला जाऊ शकतो."