लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : अफगाणिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात हॅट्रिक घेतली होती. या निर्णायक षटकात शमीने भेदक मारा केला आणि भारताला विजय मिळवून दिला. पण आता या पुढच्या सामन्यात शमी खेळणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची वार्ता आली आहे. संघाचा प्रमुख गोलंदा भुवनेश्वर कुमार मंगळवारी इंडोअर नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीला संघात खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानं त्याचं सोनंही केलं. शिवाय भुवीची दुखापत लक्षात घेता नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी बीसीसीआयनं नवदीप सैनीला बोलावून घेतले होते. पण, आता भुवीलाच गोलंदाजी करताना पाहिल्यानंतर चाहते त्याच्या पुनरागमनाकडे लक्ष ठेवून आहेत.
भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे माघारी परतला होता. पण त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे भुवनेश्वर कुमारला या सामन्याला मुकावे लागले होते. भुवनेश्वरने दुखापतीपूर्वी २.४ षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरीत दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते. त्यानंतर भुवी मैदानावर परतला नाही. त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळता आले नव्हते. त्याच्या अनुपस्थितीत शमीनं संघात स्थान पटकावून अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिकची नोंद केली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळता आले नव्हते. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीला संधी देण्यात आली होती. शमीनेही या संधीचे सोने करून दाखवले होते. त्यामुळे आता जर भुवनेश्वर फिट झाला तर पुढच्या सामन्यात शमीला संधी मिळणार का हा महत्वाचा प्रश्न असेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये २७ जूनला सामना होणार आहे. पण या सामन्यासाठी संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण भुवनेश्वर फिट असेल तर त्याला संधी द्यायची की शमीला, हा मोठा प्रश्न असेल. पण जर भुवनेश्वर शंबर टक्के फिट नसेल तर या सामन्यात शमीलाच संधी मिळू शकते.