लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पावसामुळे चार सामने रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियोजनावर टीका होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय संघाची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली त्यात पुरेशी सुविधाच उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणे नसल्यानं खेळाडूंना व्यायामासाठी प्रायव्हेट जिममध्ये जावं लागत आहे.
'' हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणं नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना प्रायव्हेट जिममध्ये जावं लागत आहे. त्यामुळे त्यांना तंदुरुस्ती राखण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे,'' अशी माहिती सूत्रांनी दिली. या एकाच समस्येचा खेळाडूंना सामना करावा लागत नाही, तर असे अनेक प्रश्न सतावत आहेत. ''लंडनमध्ये एक चांगलं हॉटेल मिळणं अवघड झालं आहे. ज्यात अत्याधुनिक जिम, स्विमींग पूर, एअर कंडिशनल रूम गरजेचे आहे. इंग्लंडने याचा विचार करायला हवा,''असेही सूत्रांनी सांगितले.
भारतीय संघाचा चाहतावर्ग लक्षात घेता सुरक्षिततेचे प्रश्नही भेडसावत आहेत.''सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली पाहीजे. खेळाडूंना भेटण्यासाठी अनेक चाहते हॉटेलभवती घोळका करून असतात. त्यामुळे खेळाडूंना ट्रेनएवजी बसने प्रवास करावा लागत आहे. त्याने त्यांचा वेळही खर्ची जात आहे,''अशा अनेक समस्यांचा पाढा वाचण्यात आला. आयसीसीनं या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी, असं मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं व्यक्त केलं. पाकचा सामना कसा कराल, 'विराट'सेनेसाठी तेंडुलकरचा मास्टर प्लानपावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक मास्टर प्लान दिला आहे.
रविवारच्या सामन्यात मोहम्मद आमीर आणि वाहब रियाज हे गोलंदाज भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरतील असे मत, 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या तेंडुलकरनं व्यक्त केले आहे. तो म्हणाला,''भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे सर्वाधिक अनुभवी फलंदाज आहेत आणि पाकिस्तानने त्यांच्याविरोधात नक्की रणनीती तयार केली असेल. आमीर व रियाज हे दोघंही रोहित व विराटची विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतील, परंतु त्याचवेळी रोहित व विराट त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील. माझा सल्ला असा आहे की अन्य खेळाडूंनी त्यांना साथ द्यावी.''