ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना बांगलादेशविरुद्ध 6 बाद 386 धावांचा डोंगर उभा केला. जेसन रॉयच्या 153 धावा आणि जॉनी बेअरस्टो ( 51), जोस बटलर (65) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या उभी केली. 387 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेशला चौथ्याच षटकात धक्का बसला. बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकार इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. सौम्याची ही विकेट मात्र थोडी विचित्र ठरली. आर्चरने टाकलेला चेंडू यष्टिंचा वेध घेत सीमारेषेपार गेला( म्हणजे थेट षटकारच)... क्रिकेटमध्ये अशी विचित्र घटना प्रथमच घडली असावी.
जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी उभ्या केलेल्या मजबूत पायावर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांनी धावांचे इमले उभे केले. इंग्लंडने शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात बांगलादेश संघासमोर विजयासाठी 387 धावांचे आव्हान ठेवले. रॉयने 153 धावांची खेळी, तर बेअरस्टो व बटलर यांचे अर्धशतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी 2011मध्ये भारताविरुद्ध 338 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडने या सामन्यात भारताचा विक्रम मोडला. इंग्लंडने 6 बाद 386 धावा केल्या. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 7 सामन्यांत 300+ धावा करणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: ICC World Cup 2019 : Incredible dismissal, Ball flies for 'six' off the top of the bails, A wicket for Archer!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.