लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाजल ख्रिस गेल विश्वचषकातील आज अखेरचा सामना खेळला. वेस्ट इंडिजचा संघाचाही या विश्वचषकातील हा अखेरचा सामना होता. आपल्या अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला आणि गेलचाही विश्वचषकातील शेवट गोड झाला. पण या सामन्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने गेलला एक अविस्मरणीय भेट दिली. ही भेट गेलच्या कायम लक्षात राहील अशीच आहे.
विश्वचषकातील आपला अखेरचा सामना जिंकण्याचे भाग्य गेलच्या नशिबी होते. सामना संपल्यावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी गेलला मिठी मारली. त्याचबरोबर विजयानंतर सामन्यातील चेंडू गेलला भेट देण्यात आला.
वेस्ट इंडिजने केला शेवट गोड, अफगाणिस्तानचा 'भोपळा' कायम
वेस्ट इंडिने आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकाचा शेवट गोड केला. दुसरीकडे अफगाणिस्तानला मात्र गुणांचा भोपळा फोडता आला नाही. कारण अफगाणिस्तानला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या इव्हिन लुईस (58), शे होप (77) आणि निकोलस पुरन (58) यांनी अर्धशतक झळकावल्यामुळे त्यांना तिनशे धावांचा टप्पा गाठता आला. जेसन होल्डरने जलदगतीने 45 धावांची खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला अफगाणिस्तानपुढे 312 धावांचे आव्हान ठेवता आले.
वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला दुसऱ्याच षटकत पहिला धक्का बसला. पण त्यानंतर रहमत शाह (62) आणि इक्राम अलिखील (86) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळेच अफगाणिस्तानने आपले आव्हान कायम ठेवले होते. पण हे दोघे बाद झाल्यावर मात्र अफगाणिस्तानचे फलंदाज मोठा फटके मारण्याच्या नादात बाद होत गेले आणि त्यांना सामना गमवावा लागला.
Web Title: ICC World Cup 2019: Incredible gift to Chris Gayle in the final match of the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.