ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. ऑस्ट्रेलियाः भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम 352 धावांची खेळी केली. भारताच्या या एव्हरेस्टएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी सावध खेळ केला. कर्णधार अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी कोणताही धोका पत्करला नाही. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरेल असे वाटत होते, परंतु दोघांमधील समन्वय चुकला आणि ऑसींना पहिला धक्का बसला. वॉर्नर दुसरी धाव घेण्यास धावला, पण फिंचच्या मनात हो-नाय ची तळमळ सुरू होती. अखेरीस त्यानेही धाव घेतली आणि केदार जाधवच्या थ्रो वर हार्दिक पांड्याने त्याला धावबाद केले. चांगली खेळी करणाऱ्या फिंचला बाद केल्यानंतर भारतीय चमूत जल्लोष झाला. फिंच मात्र प्रचंड नाराजी प्रकट करत पेव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर त्यानं ड्रेसिंग रूममध्ये शिरताच आपली बॅट जोरानं दिवाळावर आदळली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019, IND vs AUS : धावबाद झाला म्हणून अॅरोन फिंचनं रागात केलं असं काही, Video
ICC World Cup 2019, IND vs AUS : धावबाद झाला म्हणून अॅरोन फिंचनं रागात केलं असं काही, Video
ICC World Cup 2019, IND vs AUS:भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम 352 धावांची खेळी केली. भारताच्या या एव्हरेस्टएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी सावध खेळ केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 8:46 PM