ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण, या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाच्या संशयास्पद कृतीनं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चेंडू कुरतडण्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा ऑसी खेळाडूकडून अशी संशयास्परद हालचाल होण्याने क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. याच प्रकरणात गतवर्षी ऑसींचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती. स्मिथ व वॉर्नर यांना वर्षभरासाठी, तर बॅनक्रॉफ्टला नऊ महिने क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले होते. ती शिक्षा पूर्ण करून स्मिथ व वॉर्नर ऑसी संघात परतले आहेत. त्यातच आता झम्पाच्या या कृत्याने पुन्हा हे प्रकरण डोकं वर काढण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ...
भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी डेव्हिड वॉर्नरची 'सेंसर' स्ट्रॅटजी!भारताचा सामना करण्यासाठी ऑसी संघ तितक्याच ताकदीनं मैदानावर उतरण्यास सज्ज होत आहेत. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव केला. मात्र, ऑसींच्या डेव्हिड वॉर्नरने जोरदार फटकेबाजीवर भर दिला. भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी वॉर्नर आणखी एक 'सेंसर' स्ट्रॅटजी वापरणार आहे.
सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहचा सामना करण्यासाठी वॉर्नर सज्ज झाला आहे. त्यानं त्याच्या बॅटला विशेष प्रकारचं सेंसर लावून घेतलं आहे. ज्याच्यातून त्याला प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चेंडू वेग आणि आपल्या बॅटीच्या फटक्याचा वेग आदी गोष्टी माहित पडणार आहेत. 2017मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बॅट सेंसरला मान्यता दिली, परंतु त्याचा उपयोग तितकासा होताना दिसत नाही. बंगळुरूस्थीत कंपनीनं हा सेंसर शोध लावला. ही सेंसर चीप बॅटीवर लावून फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांबाबत बराच डाटा गोळा करू शकतो. ही चीप बॅटीच्या दांड्यावर लावली जाते. फलंदाज मैदानावर खेळत असताना चीपशी जोडलेल्या मोबाईल अॅपवर डाटा गोळा होत असतो.
वॉर्नरने गोळा केलेल्या डाटानुसार कसून सराव केला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास.. बुमराहच्या यॉर्करचा सामना करण्यासाठी फलंदाजाला 70-75 किलोमीटरच्या वेगाने बॅटीनं फटका मारावा लागतो. पण, वॉर्नरने 85 ते 90 km वेगानं फटका मारण्याचा सराव केला आहे.
Web Title: ICC World Cup 2019 IND vs AUS : Sandpapergate saga as Adam Zampa pockets something after using it on ball
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.