ICC World Cup 2019, IND vs AUS : शिखर धनवची दुखापत गंभीर, म्हणून आला नाही फिल्डींगला?

ICC World Cup 2019, IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या शिखर धवनला दुखापत झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 08:31 PM2019-06-09T20:31:18+5:302019-06-09T20:31:45+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019, IND vs AUS: Shikhar Dhawan's injury serious? | ICC World Cup 2019, IND vs AUS : शिखर धनवची दुखापत गंभीर, म्हणून आला नाही फिल्डींगला?

ICC World Cup 2019, IND vs AUS : शिखर धनवची दुखापत गंभीर, म्हणून आला नाही फिल्डींगला?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ओव्हल, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करणाऱ्या शिखर धवनला दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याच्या अंगठ्याला ही दुखापत झाली आणि त्यामुळे त्याला वैद्यकिय मदत घ्यावी लागली. पण, तरीही तो मैदानावर टिकून राहिला आणि त्याने 117 धावांची खेळी करताना भारतीय संघाला 352 धावांपर्यंत मजल मारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. पण, धवन त्यानंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. त्याच्याजागी रवींद्र जडेजा मैदानावर दिसला. त्यामुळे धवनची दुखापत गंभीर असल्याची चर्चा रंगली आहे.

नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं... आज सारं काही भारतासाठी पोषक होतं. भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला 5 बाद 352 धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने 1987साली दिल्लीत 6 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 


आयसीसीच्या स्पर्धेत एकाच मैदानावर तीन शतकं झळकावणारा धवन पहिलाच फलंदाज ठरला. धवनचे ओव्हल मैदानावरील तिसरे शतक आहे. 2019मधील त्याचे हे पहिलेच, तर क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे शतक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चौथ्यांदा शतकी खेळी केली आहे. अजय जडेजा ( 1999) याच्यानंतर ओव्हलवर वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. 
 

Web Title: ICC World Cup 2019, IND vs AUS: Shikhar Dhawan's injury serious?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.