Join us  

ICC World Cup 2019 :...तर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान येतील आमनेसामने!

भारतीय संघ अव्वल स्थानी सहज कब्जा करू शकतो. मात्र, यासाठी भारताला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. त्याच वेळी क्रिकेटचाहत्यांना वेध लागले आहेत, ते भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याचे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 4:25 AM

Open in App

 मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाने विजयी घोडदौड कायम राखली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ असून, अद्याप या संघाचे तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळेच गुणतालिकेत ११ गुणांसह दुसऱ्या स्थानी असलेल्या भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी केवळ एक विजयही पुरेसा आहे. मात्र, एकूणच संघाचा सुरू असलेला धडाका पाहता, भारतीय संघ अव्वल स्थानी सहज कब्जा करू शकतो. मात्र, यासाठी भारताला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. त्याच वेळी क्रिकेटचाहत्यांना वेध लागले आहेत, ते भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याचे...  १६ जूनला झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानला सहज नमविले. मात्र, यानंतर पाकिस्तानने आपल्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा करताना दक्षिण आफ्रिका आणि फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडला धक्का देत, उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवल्या. त्याच वेळी इंग्लंडला प्रथम श्रीलंका आणि त्यानंतर आॅस्टेÑलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने, पाकिस्तानच्या आशा अधिक उंचावल्या असून उपांत्य फेरीसाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. 

पाकिस्तानला पुढील दोन सामन्यांत अनुक्रमे अफगाणिस्तान व बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. या दोन्ही संघांविरुद्ध पाक तुलनेत बलाढ्य आहे. त्यामुळेच पाकचा विजय सध्या तरी गृहीत मानला जात आहे. मात्र, असे असले, तरी त्यांना इतर संघांच्या कामगिरीवरही अवलंबून राहावे लागेल. पाकला उपांत्य फेरीसाठी इंग्लंड व श्रीलंकाचा एक पराभव आवश्यक आहे. त्याच वेळी न्यूझीलंड संघाने आपले उर्वरित सामने गमावणेही पाकच्या हिताचे ठरणार आहे. सर्वकाही पाकिस्तानच्या बाजूने घडल्यास पाक संघ चौथ्या क्रमांकावर बाजी मारून उपांत्य फेरी गाठू शकतो आणि भारताने विजयी मालिका कायम राखली, तर अव्वल स्थानावर कब्जा करून भारतीय संघाची दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश होईल. 

पहिल्या व चौथ्या स्थानावर चाहत्यांचे लक्ष पाकचा फॉर्म पाहता पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान थरार अनुभवण्याची संधी मिळेल. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना हा गुणतालिकेतील अव्वल आणि चौथ्या स्थानावरील संघांमध्ये होईल. दुसरा उपांत्य सामना दुसºया व तिसºया स्थानावरील संघांमध्ये होईल.  आतापर्यंत केवळ कांगारूंचीच आगेकूच आॅस्टेÑलियाला केवळ भारताविरुद्ध धक्का बसला. यानंतर त्यांनी ७ पैकी ६ सामने जिंकत १२ गुणांसह थेट उपांत्य फेरी गाठली. तसेच अफगाणिस्तान, द. आफ्रिका व वेस्ट इंडिज यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने, आता केवळ भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान व श्रीलंका यांच्यात चुरस सुरू आहे. यापैकी भारत व न्यूझीलंड यांना केवळ एका विजयाची गरज आहे. त्यामुळे इंग्लंड, बांगलादेश, पाक व श्रीलंका यांच्यासाठी पुढील सामेन आता काँटे की टक्कर ठरतील.

 
टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानविराट कोहली