लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. पण हा सामना भारतीय संघ पराभूत होऊ शकतो, असे काही टीकाकार म्हणत आहेत. या गोष्टीचे कारणही आता समोर आले आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला ही गोष्ट भारी पडू शकते.
भारतीय संघाने आतापर्यंत विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकले आहेत. पण आता त्यांना काही गोष्टी सतावत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, भारताच्या मधल्या फळीला अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. महेंद्रसिंग धोनीसह, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, केदार जाधव, दिनेश कार्तिक यांना अजूनही विश्वचषकात छाप पाडता आलेली नाही.
भारताला या विश्वचषकात सर्वात जास्त एका खेळाडूची चिंता आहे. तो खेळाडू म्हणजे कुलदीप यादव. विश्वचषकात कुलदीप चांगली गोलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळे यापुढील सामन्यात कुलदीपला संघात घ्यायचे की नाही, हा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड सामना रद्द झाला तर कोण जाणार अंतिम फेरीत, जाणून घ्या...भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी होणार आहे. यापूर्वी साखळी फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला होता. पण आता भारत आणि न्यूझीलंड यांची गाठ उपांत्य फेरीत पडणार आहे. पण हा सामना रद्द झाला तर अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, याची उत्सुकता तुम्हाला असेल.
यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होता. पण आता उपांत्य फेरीतील सामना जर पावसामुळे रद्द झाला तर काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 9 जुलैला खेळवण्यात येणार आहे. जर या दिवशी पाऊस पडला, तर त्यासाठी 10 जुलै हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण या दिवशीही पाऊस पडला तर काय होणार, हा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आता ही गोष्ट सर्वात जास्त चिंतेत पाडणारी आहे.
पावसामुळे जर हा सामना रद्द करण्याची पाळी आली, तर दोन्ही संघांतील सामन्यात नेमके काय झाले हे पाहावे लागते. पण भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यामुळे या सामन्याचा निकाल महत्वाचा ठरत नाही. त्यामुळे आता उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर गुणतालिका पाहिली जाईल. गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला तर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल.