लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताने आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत निळ्या जर्सीनेच सर्व सामने खेळले आहेत. भारतासाठी निळी जर्सी लकी असल्याचेही काही जण म्हणतात. पण आता इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला निळ्या जर्सीने खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांचा सामना ३० जूनला होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करू शकते, असे म्हटले जात आहे.
भारताने जर्सी का बदलायचीआतापर्यंत भारताने विश्वचषकात निळ्या रंगाच्या शेड्सच्या जर्सी परीधान केल्या आहेत. आतापर्यंत भारताने विश्वचषकात निळा रंग बदललेला नाही. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार आहे. या गोष्टीचे महत्वाचे कारण म्हणजे इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची आहे. एका सामन्यात दोन्ही संघ सारख्या रंगाची जर्सी वापरू शकत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 'ऑरेंज जर्सी' परीधान करणार असल्याचे म्हटले जात आहे.
ही 'ऑरेंज जर्सी' असेल तरी कशी...सध्याच्या घडीला भारतीय संघ निळ्या रंगाची जर्सी परीधान करत असला तरी कॉलर मात्र ऑरेंज रंगाची आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही रंगसंगती उलटी होऊ शकते. इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाच्या जर्सीचा रंग ऑरेंज असेल तर कॉलर मात्र निळ्या रंगाची असेल. मात्र ही जर्सी नेमकी कशी असेल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. कारण या जर्सीचे अनावरण अद्याप करण्यात आलेले नाही.
भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडला सुट का? भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा आहे. त्यामुळे एका संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागेल. पण यावेळी भारतानेच का जर्सीचा रंग बदलायचा, इंग्लंडने आपल्या जर्सीचा रंग बदलावा, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण नियमानुसार यजमान संघाच्या जर्सीचा रंग बदलला जात नाही. त्यामुळे इंग्लंडला यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा संघ निळ्या जर्सीमध्येच उतरणार आहे.