लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णयाक सामना उद्या होणार आहे. या सामन्यातील विजयामुळे दोन्ही संघांचे भविष्य बदलू शकते. कारण इंग्लंडने जर हा सामना गमावा तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी भारताचा संघ उत्सुक असेल.
सध्याच्या घडीला भारत हा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने सामना सामन्यांमध्ये पाच सामने जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारताला एका गुणावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भारताचे सध्याच्या घडीला 11 गुण आहेत. त्यामुळे हा सामना जर भारताने जिंकला तर 13 गुणांसह ते उपांत्य फेरी गाठू शकतात.
इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या सुरुवातीला अव्वल स्थानावर विराजमान होता. पण आता इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकणार की नाही, याबाबत संदिग्धता आहे. कारण इंग्लंड आतापर्यंत सात सामने खेळला आहे. या सात सामन्यांमध्ये इंग्लंडने चार सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडचा संघ सध्या आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पण इंग्लंडने जर उर्वरीत दोन सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आत्तापर्यंत अपराजित असलेली टीम इंडिया रविवारी, ३० जूनला यजमान इंग्लंडशी दोन हात करणार आहे. विराटसेनेनं विजयाचा सिलसिला सुरूच ठेवून जेतेपदावरील दावा आणखी पक्का करावा, असं भारतीयांना नक्कीच वाटतंय. पण, हा सामना वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरलाय. ते कारण आहे, भारतीय संघाच्या जर्सीचा बदललेला रंग.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात जर पाऊस पडला तर दोन्ही संघांना एक गुण मिळू शकतो. पण त्यामुळे इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात पाऊस पडणार की नाही, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. रविवारी पूर्ण दिवस चांगला सूर्यप्रकाश असेल, त्याचबरोबर तापमान 26 अंश असू शकते. त्यामुळे या सामन्यात जास्त धावा पाहायला मिळातील, असे म्हटले जात आहे.
Web Title: ICC World Cup 2019: India-England match will held on tomorrow, rain will be in the mach or not....
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.