ललित झांबरे, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी होणारा उपांत्य फेरीचा सामन्यावर पावसाचे सावट आहे. British MET departmentच्या माहितीनुसार सामन्यादरम्यान ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाची शक्यता 50 टक्के आहे आणि त्यामुळे सामना थोडा उशीरा सुरू होऊ शकतो. योगायोग म्हणजे साखळी फेरीत उभय संघांमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. हा सामना जर रद्द झाला तर भारतीय संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळू शकते. पण आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडपेक्षा भारताचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळाले आहे.
आतापर्यंत भारतीय संघ सहा वेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सहापैकी तिनदा भारताचा संघ विजयी ठरला आहे, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंडचा संघ आतापर्यंत सातवेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सातपैकी फक्त एका उपांत्य फेरीत त्यांना विजय मिळवता आला आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वाधिक यशस्वी ठरला आहे तो ऑस्ट्रेलियाचा संघ. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत सातवेळा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सात सामन्यांपैकी तब्बल सहा उपांत्य फेरींमध्ये त्यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.
संघ सामने विजय परा. टायऑस्ट्रेलिया 7 6 0 1भारत 6 3 3 0इंग्लंड 5 3 2 0न्यूझीलंड 7 1 6 0
*यापैकी भारत वगळता इतर तिन्ही संघ पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत (1975) उपांत्य फेरीत पोहचले होते. भारतीय संघ 1983 मध्ये पहिल्यांदा उपांत्य फेरीत पोहचला होता.
*विश्वचषक उपांत्य सामन्यांमध्ये अपराजित राहिलेला ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे. त्यांच्या 7 उपांत्य सामन्यांपैकी केवळ एकच सामना त्यांना जिंकता आलेला नाही मात्र हा एक सामना त्यांनी गमावलेलासुध्दा नाही. हा एक सामना दक्षिण आफ्रिकेविरुध्द 1999 मध्ये 'टाय' सूटला होता.
*विश्वचषक उपांत्यफेरीचा एकही सामना जिंकू न शकलेला संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका. त्यांनी चार वेळा उपांत्य फेरी गाठली. त्यापैकी तीन सामने गमावले तर एक 'टाय' सूटला.
*विश्वचषक उपांत्य सामन्यांमध्ये सर्वाधिक सहा विजय ऑस्ट्रेलियाचे आहेत तर सर्वाधिक सहा पराभव न्यूझीलंडचे आहेत.
*विश्वचषक उपांत्य फेरीत भारत वि. न्यूझीलंड असा सामना प्रथमच होणार आहे तर ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड अशी लढत दुसऱ्यांदा होणार आहे.
*उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड हे याआधी 18 जून 1975 रोजी लढले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने चार गडी राखून विजय मिळवला होता.विश्वचषकात