Join us  

ICC World Cup 2019 : ठरलं... उपांत्य फेरीत भारत भिडणार 'या' संघाशी; बर्मिंगहॅमवर होणार महामुकाबला?

ICC World Cup 2019: भारतीय संघाने मंगळवारच्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 9:17 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने मंगळवारच्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. इंग्लंडने बुधवारी न्यूझीलंडला पराभूत करून अंतिम चौघांत प्रवेश केला.  ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांचे उपांत्य फेरीतील संघ हे जवळपास निश्चित आहेत. कारण, कितीही झालं तरी या शर्यतीत असलेल्या पाकिस्तानला मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करणे हे अशक्यच आहे. त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या निकालानंतर गुणतालिकेतील क्रमवारी निश्चित होईल. पण, सद्य स्थितीत भारताला उपांत्य फेरीत कोणाचा सामना करावा लागेल हे निश्चित झालेलं पाहायला मिळेल.

या आठवड्यात साखळी फेरीचे सर्व सामने संपतील. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. आफ्रिकेची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल. त्यापाठोपाठ भारतीय संघ असेल. भारताला अखेरच्या लढतीत श्रीलंकेचा सामना करायचा आहे आणि ही लढत जिंकून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिल. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यास त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण होईल आणि टीम इंडिया टॉप वर राहिल. पण, तशी शक्यता फार कमीच आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडने आपले स्थान पक्के केले आहे. न्यूझीलंड चौथ्या स्थानावर असेल. 

आयसीसीच्या नियोजीत वेळापत्रकानुसार गुणतालिकेतील अव्वल संघ हा उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावरील संघाशी, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघ यांच्यात सामना होईल. त्यानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हा पहिला उपांत्य सामना मँचेस्टर येथे होईल, तर भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहॅम येथे होईल. पण, जर अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास आणि दुसरीकडे भारताने विजय मिळवल्यास ही क्रमवारी बदलेल. भारत अव्वल स्थानावर जाईल आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यास. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड असे उपांत्य फेरीचे सामने होतील.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतआॅस्ट्रेलियाइंग्लंडन्यूझीलंड