कोलकाता : दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक जॅक कॅलिसने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी एका खेळाडूचे नाव सुचवले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात दिनेश कार्तिकचे नाव नसल्यास आश्चर्य वाटेल, असे कॅलिसने म्हटले आहे. शिवाय कार्तिकला संघात न घेणे ही भारताची मोठी चूक ठरेल, असेही तो म्हणाला. वर्ल्ड कपसाठी निवडण्याते येणाऱ्या 15 सदस्यीय चमूत कार्तिकला संधी मिळेल, असा विश्वास कोलकाताच्या प्रशिक्षकाने व्यक्त केला आहे आणि कार्तिक हा संघातील चौथ्या क्रमांकाची गुंतागुंत सोडवेल, असेही त्याला वाटते.
2018 मध्ये झालेल्या निदाहास चषक ट्वेंटी-20 स्पर्धेत कार्तिकने फिनिशरची भूमिका चोख वटवली होती. कॅलिस म्हणाला,''दिनेश कार्तिकला वर्ल्ड कप संघात न घेतल्यास ती भारताची मोठी चूक ठरेल. त्याच्याकडे अनुभव आहे आणि कठीण प्रसंगी त्याचा हाच अनुभव संघाच्या कामी येणार आहे. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय आहे. कार्तिक हा मी पाहिलेला सर्वोत्तम फिनिशर आहे.''
2017 नंतर भारताकडून खेळलेल्या 20 वन डे सामन्यांत कार्तिकने 46.75च्या सरासरीने 425 धावा केल्या आहेत. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकेल असा विश्वासही कॅलिसने व्यक्त केला. तो म्हणाला,''2019चा वर्ल्ड कप हा सर्वांसाठी खुला आहे आणि भारतीय संघ या शर्यतीत आघाडीवर असेल.''
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे
वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांचीच 'तुफानी' चालणार
IPL च्या कामगिरीवर वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पाहू नका, विराट कोहलीचा मास्टर स्ट्रोक
भारताचे 'हे' शिलेदार 8 वर्षांचा वर्ल्ड कप दुष्काळ संपवणार!