ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?

ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत स्वप्नवत वाटचालीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. भारतीय संघाला आज अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेशी सामना करावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 12:21 PM2019-07-06T12:21:24+5:302019-07-06T12:21:44+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 : Indian cricket team’s fitness trainer Basu, physio Farhart to quit after World Cup: Report | ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत स्वप्नवत वाटचालीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. भारतीय संघाला आज अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेशी सामना करावा लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. भारतीय संघ वर्ल्ड कप उंचावेल की नाही, हे 14 जुलैलाच स्पष्ट होईल. पण, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन सदस्य भारतीय संघाची साथ सोडणार असल्याचे समजत आहे. 

भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी वर्ल्ड कपनंतर संघासोबत नव्यानं करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयनं करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे, वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.''


भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केले होते. विराट कोहलीच्या फिटनेसचे श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनंही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की,'' मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवलं.'' 


Web Title: ICC World Cup 2019 : Indian cricket team’s fitness trainer Basu, physio Farhart to quit after World Cup: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.