ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019भारत वि. न्यूझीलंड : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर भारतीय संघ आज न्यूझीलंडचा सामना करणार आहे. नॉटिंगहॅम येथील वातावरणाचा अंदाज घेता हा सामना होण्याची शक्यता फार कमीच आहे. स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ अपराजित आहेत. न्यूझीलंडने तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान घेतले आहे, तर भारत दोन विजयासह चौथ्या स्थानी आहे. आज दोन्ही संघांना समान गुणावर समाधान मानावे लागल्यास भारत दुसऱ्या स्थानी येईल. पण, तत्पूर्वी ट्रेंट ब्रिजवरील भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमची आपण सफर करूया..
पाहा संपूर्ण व्हिडीओ
बाद फेरीच्या सामन्यासाठी राखीव दिवस''हा बेभरवशी पाऊस आहे. येथे जूनमध्ये होणाऱ्या पावसाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. 2018 मध्ये येथे 2 मिमी पावसाची नोंद झाली होती, परंत आता केवळ 24 तासांत 100 मिमी पाऊस पडला आहे. बाद फेरीच्या सामन्यांसाठी आम्ही राखीव दिवस ठेवला आहे,'' अशी माहिती रिचर्डसन यांनी दिली.
केदार जाधवचे वरुण राजाला साकडे, महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी गाऱ्हाणंयंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारतानं दोन सामने जिंकून टॉप फोरमध्ये मुसंडी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर आज पाणी फिरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवनं पावसाकडे गाऱ्हाणं गायलं आहे. त्यानं नॉटिंगहॅम येथे नाही, तर महाराष्ट्रात तुझी गरज असल्याची विनंती वरुण राजाला केली आहे.