Join us  

ICC World Cup 2019 : 'या' स्टेडियमवर भारत खेळणार पहिला सामना, यापूर्वी कशी झालीय कामगिरी?

ICC World Cup 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 11:44 AM

Open in App

साउदम्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आफ्रिकेला वर्ल्ड कप स्पर्धेत दोन पराभवांचा सामना करावा लागला असला तरी त्यांना हलक्यात लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेतेपदाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्यासाठी भारतीय खेळाडू कसून सरावाला लागले आहेत. विशेषतः भारतीय गोलंदाज आपला दबदबा सिद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत. सराव सत्रात रोहित शर्माच्या हातावर चेंडू आदळला, परंतु चिंतेचे कारण नाही. साउदम्टन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

 या स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेचे पाच सामने खेळवण्यात येणार आहेत आणि ज्यात भारताच्या दोन सामन्यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेसह भारतीय संघ 22 जूनला अफगाणिस्तानचा याच मैदानावर सामना करणार आहे. 2001 साली हे स्टेडियम तयार करण्यात आले. कौंटी क्रिकेटमधील हॅम्पशायर क्लबचे हे घरचे मैदान आहे आणि त्याची क्षमता 15000 प्रेक्षकांची आहे. या मैदानावर प्रथमच वर्ल्ड कप सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर भारतीय संघ तीन वन डे सामना खेळला आहे आणि त्यात त्यांना एकच विजय मिळवता आलेला आहे. 11सप्टेंबर 2004 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत केनियावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 आणि 2011मध्ये झालेल्या सामन्यांत त्यांना इंग्लंडकडून हार पत्करावी लागली आहे.

याच मैदानावर आफ्रिकेनेही तीन सामने खेळले आहेत आणि त्यात दोन सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्यांनी 2003 मध्ये झिम्बाव्बे आणि 2012 मध्ये इंग्लंडला येथे नमवले आहे. 2017 मध्ये त्यांना इंग्लंडकडून हार मानावी लागली. 

भारतीय संघाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार, जाणून घ्या कारणवर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्याला सामोरे जाण्यापूर्वी भारतीय संघावर लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी सामना होणार आहे आणि या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंनी मंगळवारी कसून सराव केला. पण, या सराव सत्रानंतर संघ व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेसाठी खलील अहमद, अवेश खान आणि दीपक चहर यांना पाठवले. या परिषदेसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री किंवा संघातील वरिष्ठ खेळाडू येणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्यानं नाराज झालेल्या मीडियाने परिषदेवर बहिष्कार टाकला. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयद. आफ्रिकाभारत