साऊदम्पटन : भारत धाव सरासरी उत्कृष्ट करण्याच्या निर्धाराने विश्वचषकात शनिवारी पराभवांमुळे खचलेल्या अफगाणिस्तावर मोठा विजय नोंदवण्यासाठी खेळणार आहे. जेतेपदाचा दावेदार असलेल्या भारताचाअफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकतर्फी होण्याची शक्यता असून भारतीय फलंदाज नवे विक्रम नोंदवू शकतात. मोठ्या विजयामुळे भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग देखील सोपा होईल.अफगाणिस्तानची विश्वचषक मोहीम मैदानाच्या आत आणि बाहेर घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांमुळे खराब झाली. भारताने सुरुवातीपासून द. आफ्रिका, स्ट्रेलिया आणि पाकिस्तानवर वर्चस्वपूर्ण विजय मिळविल्याने आत्मविश्वास उंचावला आहे. शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि आता विजय शंकर जखमी झाल्यानंतरही भारताने स्पर्धेत वर्चस्व कायम केले आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखर जखमी झाल्यानंतर पाकविरुद्ध लोकेश राहुल याने अर्धशतकी खेळी करीत शिखरची उणीव जाणवू दिली नव्हती. रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये असल्याने अफगाण संघाविरुद्ध आणखी एक दुहेरी शतक ठोकू शकतो. प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी कमुकवत आहेच शिवाय मुख्य गोलंदाज राशिद खान फॉर्ममध्ये नाही.भारताची गोलंदाजी संतुलित असली तरी आम्ही अफगाणिस्तानला कमकुवत मानत नसल्याचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने म्हटले आहे. ऑस्ट्रेलिया असो वा अफगाणिस्तान, आम्ही दोन्ही संघांना समान सन्मान देतो असे तो म्हणाला. अफगाणिस्तानविरुद्ध मोहम्मद शमी याला पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकते. मोहम्मद शमीचे वेगवान आणि वळण घेणारे चेंडू प्रतिस्पर्धी अनुभवहीन फलंदाजांसाठी संकट उभे करू शकतील. त्यात भर म्हणजे कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकीपटूंचा सामना करणे अफगाणिस्ताला सोपे जाणार नाही. तरीही हा संघ भारताला कडवे आव्हान देत स्वत:चा आत्मविश्वास उंचाविण्याचा प्रयत्न नक्की करेल यात शंका नाही. (वृत्तसंस्था)हेड-टू-हेडदोन्ही संघांमध्ये आतापर्यंत विश्वचषकामध्ये एकही सामना झालेला नाही.दोन्ही संघांदरम्यान सन २०१४ पासून आतापर्यंत २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी भारताने १ सामना जिंकला आहे, तर एक सामना टाय झाला आहे.फलंदाजांना सरावाची संधी... अफगाणिस्तानविरुद्ध सर्वांची नजर भारतीय फलंदाजांवर असेल. रोहित शर्माने आपल्या लौकिकानुसार झंझावाती खेळी केली. मात्र कर्णधार कोहलीसह महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या यांना अपेक्षित खेळ करता आला नाही. त्यामुळे प्रमुख फलंदाजांना यावेळी छाप पाडण्याची संधी असेल.ऋषभ पंतला खेळण्याची संधी...शंकरची जखम संघासाठी चिंतेची बाब असली तरी संघात ऋषभ पंत याला स्थान दिले जाईल, असे संकेत मिळाले आहेत.शंकर फिट नसेल तर पंत किंवा दिनेश कार्तिक यापैकी एकाची वर्णी लागेल. सामन्यात केदार जाधव याला देखील बढती देण्याचा कोहलीचा विचार आहे.तीन सामन्यात केवळ आठ चेंडू खेळणाऱ्या जाधवला पुढील सामन्यांसाठी पुरेसा सराव मिळावा यासाठी संधी देण्याचा व्यवस्थापनाचा विचार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019: अफगाणिस्तानवर ‘विराट’ विजय नोंदवण्याचा भारताचा निर्धार
ICC World Cup 2019: अफगाणिस्तानवर ‘विराट’ विजय नोंदवण्याचा भारताचा निर्धार
रोहित शर्माला दुहेरी शतकाची; तर भारतीय संघाला धावांची सरासरी वाढविण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 1:58 AM