- हर्षा भोगले लिहितात...
विजयामुळे आत्मविश्वास उंचावतो आणि त्यामुळे संघ दमदार भासतो. चाहत्यांच्या देहबोलीवरूनही ते दिसते. पण, केवळ एका पराभवामुळे सर्वकाही बदलते. जे संघ भारताविरुद्ध खेळत आहेत, त्यांना याची कल्पना आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीनंतर जर एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना बाद केले, तर भारतीय संघाची चाचणी घेता येते, हे स्पष्ट झाले आहे. त्याचसोबत भारताच्या फिरकीपटूंवर सुरुवातीला वर्चस्व गाजवले तर त्यांची गोलंदाजी एवढी धोकादायक भासत नाही.
त्यामुळेच आत्मविश्वास व मानसिकतेची खेळात मोठी भूमिका असते. बांगलादेशला दोन सामने जिंकण्याची गरज आहे. एक पराभव त्यांना विश्वचषक स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडेल. त्यामुळे बाहेर होण्याच्या दडपणाखाली खेळतात, की स्पर्धेत आगेकूच करण्याची मिळालेली संधी म्हणून खेळतात, याबाबत उत्सुक आहे. भारत-इंग्लंड लढत झालेल्या खेळपट्टीवरच हा सामना होणार आहे. अशास्थितीत बांगलादेशचा फिरकी मारा बघता लहान सीमारेषा त्यांच्यावरही तेवढाच परिणाम करेल जेवढा भारतावर. महत्त्वाच्या सामन्यासाठी एवढी छोटी सीमारेषा का ठेवण्यात आली, हा वेगळा मुद्दा आहे. लॉर्ड््सच्या एका टोकाची सीमारेषा केवळ ५९ मीटर आहे, हेही लक्षात ठेवायला हवे.
बांगलादेशविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाला मधल्या फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. त्याचसोबत फिरकीपटूंचीही साथ मिळण्याची अपेक्षा आहे. रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर संधी देण्याची शक्यता असून, हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर खेळवायला हवे. भारतीय संघ या लढतीत दावेदार म्हणून उतरेल. माझ्या मते, इंग्लंड विरुद्धची लढत केवळ
एक धक्का होता, वास्तविकता
नाही.
Web Title: ICC World Cup 2019: India's middle order should contribute!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.