मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमाचा ज्वर आता चढू लागला आहे, परंतु यात वर्ल्ड कप संघाबाबतची चर्चा कुठेतरी मागे पडताना दिसत आहे. पण, भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या निवडीबाबत मोठी घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते पंधरा शिलेदार भारताचे प्रतिनिधित्व करतील याच्या घोषणेची तारीख प्रसाद यांनी सांगितली. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाने मागील वर्षभरात देशात-परदेशात वन डे क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या प्रतिस्पर्धींना विराटसेनेनं त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. संघातील एखादी जागा सोडल्यास वर्ल्ड कपसाठीचे शिलेदार जवळपास निश्चितच आहेत आणि त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ही घोषणा 20 एप्रिलला किंवा त्याआधी होण्याची माहिती, प्रसाद यांनी दिली.
ते म्हणाले,''आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करेल, हा विश्वास आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा 20 एप्रिल किंवा त्याआधीच होणार आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे तगडे खेळाडू या संघात असतील. मागील दीड वर्ष आम्ही त्यावर काम करत आहोत आणि त्यानुसारच हा संघ निवडला जाईल. संघावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि भारतीय संघच वर्ल्ड कप जिंकेल. ''
भारतीय संघात तीन स्थानांसाठी चुरस आहे. त्यात प्रामुख्याने चौथा क्रमांक, चौथा जलदगती गोलंदाज किंवा तिसरा फिरकीपटू आणि दुसरा यष्टिरक्षक या जागा चर्चेचा विषय आहेत. दरम्यान कर्णधार विराट कोहलीनं वर्ल्ड कपसाठीचा संघ जवळपास निश्चित असल्याचे सांगितले होते, परंतु केवळ एका स्थानासाठी बदल होईल, असेही तो म्हणाला होता.
विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे
http://www.lokmat.com/cricket/icc-cricket-world-cup-2019-schedule-be-revealed-today/
वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांचीच 'तुफानी' चालणार
http://www.lokmat.com/photos/cricket/indias-best-bowlers-odis-ahead-2019-icc-cricket-world-cup/
IPL च्या कामगिरीवर वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न पाहू नका, विराट कोहलीचा मास्टर स्ट्रोक
भारताचे 'हे' शिलेदार 8 वर्षांचा वर्ल्ड कप दुष्काळ संपवणार!
http://www.lokmat.com/photos/cricket/india-probable-team-icc-world-cup-2019/