साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : पहिल्याच सामन्यात भाराताने दक्षिण आफ्रिकेला 227 धावांत रोखले. दक्षिण आफ्रिकेची ही धावसंख्या जास्त आव्हानात्मक नसल्याचे म्हटले जात आहे. पण भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने मात्र कागिसो रबाडापासून जपून राहण्याचा सल्ला भारतीय संघाला दिला आहे.
सचिन आपल्या खास मुलाखतीमध्ये म्हणला की, " रबाडा हा अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज आहे. तो कोणत्याही परिस्थितीमध्ये भेदक मारा करू शकतो. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी रबाडापासून जपून राहायला हवे. भारतीय संघाने रबाडाचा सामना करताना हा कसोटी सामना आहे, असे डोक्यात ठेवून खेळायला हवे. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनीही धावांचा पाठलाग करताना घाई करू नये. रबाडाबरोबरच ख्रिस मॉरिसची गोलंदाजी चांगली खेळून काढायला हवी."
चहलचा बळीचौकार, भारताला विजयासाठी 228 धावांची गरजपहिल्याच सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हा सामना जिंकण्यासाठी भारताला 228 धावांची गरज आहे. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो फिरकीपटू युजवेंद चहल. चहलने चार बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा असल्याचे पहिल्या 25 षटकांमध्येच दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस (38), फेहलुक्वायो (34) यांनी थोडाफार भारताच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यांच्या़नंतर ख्रिस मॉरिसने दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
स्टेनच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार, सांगतोय दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारउजव्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला विश्वचषकाला मुकावे लागले. पण या स्टेनच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने व्यक्त केले आहे. विश्वचषकातील दोन सामन्यांच्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का स्टेनच्या रुपात बसला. दक्षिण स्टेन हा अजूनही फिट न झाल्यामुळे त्याला विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. ही माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटरवर खात्यावर दिली आहे. स्टेनच्या जागी ब्युरन हेंड्रीक्सला संघात स्थान देण्यात आले आहे.स्टेनच्या दुखापतीबाबत फॅफ म्हणला की, " स्टेन जेव्हा आयपीएलमध्ये दोन सामने खेळला त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर स्टेनने आयपीएलच्या सामन्यांमध्ये रस दाखवला नाही. पण जर स्टेन हे दोन्ही सामने खेळला नसता तर कदाचित तो यंदा विश्वचषकात आमच्याबरोबर खेळत असला असता. स्टेनने फिट होण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण अखेर त्याला विश्वचषकात खेळता आले नाही." डेल स्टेनला आयपीएलदरम्यान दुखापत झाली होती. स्टेन आरसीबीकडून आयपीएमध्ये खेळत होता. त्यावेळी 25 एप्रिलला स्टेन हा जायबंदी असल्याची बाब पुढे आली होती. स्टेनच्या उजव्या खांद्याला मार लागला होता. त्यानंतर स्टेनने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होती. पण आता दुखापतीमुळे स्टेनला विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेला मुकावे लागण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत विश्वचषकातील दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या सामन्यात तर त्यांना बांगलादेशने पराभूत करत मोठा धक्का दिला होता. त्यामुळे आता जर स्टेन संघात नसेल तर त्यांचे काय होईल, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.