साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : पहिल्या सामन्यानंतर हा आमचा प्रोफेशनल विजय होता, असे स्पष्ट मत संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
विराट म्हणाला की, " एका प्रोफेशनल संघाने जशी कामगिरी करावी, तशीच आम्ही केली. त्यामुळे हा आमचा प्रोफेशनल विजय आहे, असे मला वाटते. प्रत्येक विभागात आमच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सांघिक भावनेमुळेच आम्हाला हा विजय मिळवता आला."
रोहितची दिमाखदार खेळी
खेळपट्टी, वातावरण आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान मारा पाहता रोहितचे हे दिमाखदार शतक आहे. रोहितची ही खेळी खरंच अविस्मरणीय अशीच आहे. कारण परिस्थिती चांगली नसताना शतक झळकावणे सोपे नसते. रोहितने ते करून दाखवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे रोहितची ही अविस्मरणीय खेळी आहे, असे रोहित म्हणाला.
भारताची विजयी सलामी; आफ्रिकेची पराभवाची हॅट्ट्रिक
रोहित शर्माचे नाबाद शतक आणि युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्वचषकात विजयी सलामी दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना 227 धावा करता आल्या. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखत पूर्ण केले आणि विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेला मात्र या विश्वचषकात पराभवाची हॅट्ट्रिक पत्करावी लागली. सामनावीर रोहित शर्माने 13 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 122 धावांची खणखणीत खेळी साकारली.
दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली नाही. शिखर धवन, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना मोठ्या खेळी साकारता आल्या नाही. पण एका बाजूने रोहितने दमदार फलंदाजी करत शतक झळकावले आणि भारताचा विजय सुकर केला. रोहितला धोनीने 34 धावा करत चांगली साथ दिली.
पहिल्याच सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हा सामना जिंकण्यासाठी भारताला 228 धावांची गरज आहे. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो फिरकीपटू युजवेंद चहल. चहलने चार बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा असल्याचे पहिल्या 25 षटकांमध्येच दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस (38), फेहलुक्वायो (34) यांनी थोडाफार भारताच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यांच्या़नंतर ख्रिस मॉरिसने दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
विराट कोहलीचा अंगठा पुन्हा दुखावला, मैदानात केले उपचार
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला तीन दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. पण ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले गेले आणि पहिल्या सामन्यात कोहली मैदानात पाहायलाही मिळाला. पण कोहली अजून पूर्णपणे फिट नसल्याचेच या सामन्यात पाहायाला मिळाले. कारण या सामन्यात कोहलीचा अंगठा दुखावला आणि त्यावर मैदानातच उपचार करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा असल्याचे पहिल्या 25 षटकांमध्येच दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. यावेळीच मैदानात कोहलीचा हा प्रकार पाहायला मिळाला.
बुमराने प्रथम हशिम अमलाला बाद केले. त्यानंतर क्विटंन डीकॉकला कोहलीकरवी झेलबाद केले. डीकॉक बाद झाल्यावर भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. कोहलीनेही आनंद व्यक्त केला. पण काही वेळातच कोहलीने संघाच्या दिशेन एक खूण केली. ही खूण करताना कोहलीने आपला अंगठा दाखवला आणि त्यावर मारण्यासाठी स्प्रे आणण्यास सांगितले. झेल पकडल्यावर कोहलीचा अंगठा दुखावला, असे काही जणांना वाटत आहे. कोहलीची ही दुखापत गंभीर नसली तरी त्याने अंगठा जपायला हवा, हे नक्कीच.