साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारत वि. दक्षिण आफ्रिका : रोहित शर्माचे नाबाद शतक आणि युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विश्वचषकात विजयी सलामी दिली. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना 227 धावा करता आल्या. भारताने हे आव्हान सहा विकेट्स राखत पूर्ण केले आणि विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेला मात्र या विश्वचषकात पराभवाची हॅट्ट्रिक पत्करावी लागली. सामनावीर रोहित शर्माने 13 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 122 धावांची खणखणीत खेळी साकारली.
10:47 PM
भारताचा सहा विकेट्स राखून विजय
10:25 PM
शतकवीर रोहितला जीवदान
रोहित 107 धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरने रोहितचा सोपा झेल सोडला.
10:14 PM
रोहित शर्माचे विश्वचषकातील दुसरे शतक
09:27 PM
लोकेश राहुल आऊट
लोकेश राहुलच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. कागिसो रबाडाने राहुलला बाद केले.
08:50 PM
रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करत भारताचा डाव सावरला
05:54 PM
चहलने पटकावली चौथी विकेट
05:41 PM
डेव्हिड मिलर आऊट
युजवेंद्र चहलने मिलरला बाद करत दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का दिला.
04:45 PM
जेपी ड्युमिनी आऊट
04:35 PM
20 व्या षटकाच्या पहिल्या व अखेरच्या चेंडूवर युजवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेच्या सेट जोडीला माघारी पाठवले. व्हॅन डेर ड्यूसेन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांचा त्याने त्रिफळा उडवला.
04:32 PM
युजवेंद्र चहलनं भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याने व्हॅन डेर ड्यूसनला त्रिफळाचीत केले
04:26 PM
फॅफ ड्यू प्लेसिस-व्हॅन डेर ड्यूसेन यांची अर्धशतकी भागीदारी
04:03 PM
04:00 PM
13व्या षटकाच्या चोथ्या चेंडूवर आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिलला दुखापत... हार्दिक पांड्यानं टाकलेला चेंडू ड्यू प्लेसिसच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला.. वैद्यकिय मदत बोलावण्यात आली
03:48 PM
03:16 PM
जसप्रीत बुमराहने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमलाला माघारी पाठवले. रोहित शर्माने स्लिपमध्ये घेतला झेल
02:56 PM
02:48 PM
02:48 PM
02:41 PM
दक्षिण आफ्रिका - हाशिम अमला, क्विंटन डी'कॉक, फॅफ ड्यु प्लेसिस, रॉसी व्हॅन डेर ड्युसन, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, फेहलुक्वायो, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, इम्रान ताहीर, शॅम्सी
02:38 PM
भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
02:20 PM
जसप्रीत बुमराहचा हा 50वा वन डे सामना आहे. वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत बुमराहने 44 विकेट्स घेतल्या. या काळात एकाही गोलंदाजाला बुमराहपेक्षा अधिक विकेट घेता आलेल्या नाहीत.
02:16 PM
ICC World Cup 2019, INDvSA : भारत-दक्षिण आफ्रिका लढतीबद्दल जाणून घ्या सर्व काही, एका क्लिकवर!
Web Title: ICC World Cup 2019, INDvSA Live Update, India vs South Africa Match Score Card, Highlight, news in Marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.