Join us  

ICC World Cup 2019, INDvSA : आकडे सांगतायेत; भारताचा 'हा' फलंदाज आफ्रिकेसाठी ठरू शकतो 'गब्बर'!

ICC World Cup 2019, INDvSA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हायव्होल्टेज सामना आह साउदॅम्पटन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 12:18 PM

Open in App

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हायव्होल्टेज सामना आह साउदॅम्पटन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सलामीचाच सामना आहे, तर आफ्रिकेचा हा तिसरा सामना आहे. आफ्रिकेला पहिल्या दोन सामन्यात यजमान इंग्लंड व बांगलादेश यांच्याकडून हार मानावी लागली आहे. त्यात प्रमुख गोलंदाज डेल स्टेनने स्पर्धेतूनच माघार घेतल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड वाटत आहे. 

कर्णधार म्हणून कोहलीचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे तो किंचितसा नर्व्हस आहे. या सामन्यात त्याच्याकडून विक्रमी कामगिरीची अपेक्षा आहे. पण, आफ्रिकेला खरा खतरा आहे तो भारताचा गब्बर शिखर धवनचा... 

वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. भारताने एकमेव विजय 2015मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये आफ्रिकेला नमवले आणि त्या सामन्यात धवनने खणखणीत शतक ठोकले होते. त्याने 146 चेंडूंत 137 धावा केल्या होत्या. त्याशिवाय आयसीसीच्या स्पर्धांमध्येही धवनची आफ्रिकेविरुद्धची कामगिरी दमदार झालेली आहे. धवनने आफ्रिकेविरुद्ध 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत 78 धावा, 2015च्या वर्ल्ड कपमध्ये 137 आणि 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत 114 धावा चोपल्या आहेत.  

शिखरच्या एकूण कामगिरीवर लक्ष टाकल्यास आयसीसी स्पर्धांमध्ये त्याचे नाणे खणखणीतच दिसेल. त्याने द्विदेशीय किंवा तिरंगी मालिकेत 100 डावांत 9 शतकं आणि 21 अर्धशतकांसह 39.44च्या सरासरीनं 3986 धावा केल्या आहेत. पाच किंवा त्याहून अधिक संघाचा समावेश असलेल्या स्पर्धांमध्ये त्याने 27 डावांत 7 शतकं व 6 अर्धशतकांसह 63.34च्या सरासरीनं 1723 धावा केल्या आहेत. 

सराव सामन्यांत त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने न्यूझीलंड व बांगलादेश या संघांविरुद्ध अनुक्रमे 2 व 1 धाव केली. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फॉर्म परत मिळवण्यावर त्याचा भर असेल. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतद. आफ्रिकाशिखर धवन