Join us  

ICC World Cup 2019 INDvSA : चहलचा बळीचौकार, भारताला विजयासाठी 228 धावांची गरज

चहलने चार बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 6:24 PM

Open in App

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : पहिल्याच सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हा सामना जिंकण्यासाठी भारताला 228 धावांची गरज आहे. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो फिरकीपटू युजवेंद चहल. चहलने चार बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले.

 

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा असल्याचे पहिल्या 25 षटकांमध्येच दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस (38), फेहलुक्वायो (34) यांनी थोडाफार भारताच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यांच्या़नंतर ख्रिस मॉरिसने दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

विराट कोहली हा क्रिकेटचा जादूगार, आयसीसीने हॅरी पॉटरचीही दिली उपमाभारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाज समजला जातो. कर्णधार म्हणून कोहलीचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे तो किंचितसा नर्व्हस आहे. या सामन्यात त्याच्याकडून विक्रमी कामगिरीची अपेक्षा आहे. पण दुसरीकडे आयसीसीने कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. कोहली हा क्रिकेटचा जादुगार आहे, असे सांगताना आयसीसीने तो हॅरी पॉटर असल्याचेही म्हटले आहे.

आतापर्यंत आयसीसीने कोहलीचे दोन फोटो ट्विट केले आहेत. एका फोटोमध्ये कोहलीला हॅरी पॉटर दाखवले गेले आहे, दुसरीकडे आयसीसीने कोहलीचा राजाच्या पेहरावातील फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कोहलीच्या एका हातामध्ये बॅट आणि दुसऱ्या हातामध्ये बॉल दिला आहे. कोहलीच्या डोक्यावर यावेळी मुकुटही ठेवण्यात आलेला आहे.हॅरी पॉटरशी तुडलना करताना आयसीसीने विराटच्या कपाळावर एक चिन्ह गोंदवले आहे. त्याचबरोबर विराटने हॅरी पॉटरसारखा चश्माही यावेळी परीधान केला आहे. हॅरी पॉटरच्या फोटोखाली आयसीसीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, " विराट तू एक जादुगार आहेस. हॅरी पॉटर हे जादुगरांमधील प्रथितयश नाव आहे." 

विराट कोहलीचा अंगठा पुन्हा दुखावला, मैदानात केले उपचारभारताचा कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला तीन दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. पण ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले गेले आणि पहिल्या सामन्यात कोहली मैदानात पाहायलाही मिळाला. पण कोहली अजून पूर्णपणे फिट नसल्याचेच या सामन्यात पाहायाला मिळाले. कारण या सामन्यात कोहलीचा अंगठा दुखावला आणि त्यावर मैदानातच उपचार करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा असल्याचे पहिल्या 25 षटकांमध्येच दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना माघारी धाडले. यावेळीच मैदानात कोहलीचा हा प्रकार पाहायला मिळाला.बुमराने प्रथम हशिम अमलाला बाद केले. त्यानंतर क्विटंन डीकॉकला कोहलीकरवी झेलबाद केले. डीकॉक बाद झाल्यावर भारतीय संघाने सेलिब्रेशन केले. कोहलीनेही आनंद व्यक्त केला. पण काही वेळातच कोहलीने संघाच्या दिशेन एक खूण केली. ही खूण करताना कोहलीने आपला अंगठा दाखवला आणि त्यावर मारण्यासाठी स्प्रे आणण्यास सांगितले. झेल पकडल्यावर कोहलीचा अंगठा दुखावला, असे काही जणांना वाटत आहे. कोहलीची ही दुखापत गंभीर नसली तरी त्याने अंगठा जपायला हवा, हे नक्कीच.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019युजवेंद्र चहलजसप्रित बुमराहद. आफ्रिका