साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारतीय चाहत्यांना या सामन्यात कर्णधार विराट कोहलीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण कोहलीला जास्त धावा करता आल्या नाहीत. कारण कोहलीचा अप्रतिम झेल दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकने पकडला. डीकॉकने टिपलेला हा अप्रतिम झेल पाहायलाच हवा...
हा पाहा व्हिडीओ
कोहलीला या सामन्यात 18 धावांवर समाधान मानावे लागले. कारण सोळाव्या षटकातील तिसरा चेंडू कोहलीच्या बॅटला लागला. या चेंडूने कोहलीच्या बॅटची कडा घेतली आणि तो हवेत उडाला. यावेळी डीकॉकने हवेत सूर लगावत सुरेख झेल टिपला.
पहिल्याच सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हा सामना जिंकण्यासाठी भारताला 228 धावांची गरज आहे. भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो फिरकीपटू युजवेंद चहल. चहलने चार बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा असल्याचे पहिल्या 25 षटकांमध्येच दाखवून दिले. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस (38), फेहलुक्वायो (34) यांनी थोडाफार भारताच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यांच्या़नंतर ख्रिस मॉरिसने दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
विराट कोहली हा क्रिकेटचा जादूगार, आयसीसीने हॅरी पॉटरचीही दिली उपमा
भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम फलंदाज समजला जातो. कर्णधार म्हणून कोहलीचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. त्यामुळे तो किंचितसा नर्व्हस आहे. या सामन्यात त्याच्याकडून विक्रमी कामगिरीची अपेक्षा आहे. पण दुसरीकडे आयसीसीने कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. कोहली हा क्रिकेटचा जादुगार आहे, असे सांगताना आयसीसीने तो हॅरी पॉटर असल्याचेही म्हटले आहे.
आतापर्यंत आयसीसीने कोहलीचे दोन फोटो ट्विट केले आहेत. एका फोटोमध्ये कोहलीला हॅरी पॉटर दाखवले गेले आहे, दुसरीकडे आयसीसीने कोहलीचा राजाच्या पेहरावातील फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कोहलीच्या एका हातामध्ये बॅट आणि दुसऱ्या हातामध्ये बॉल दिला आहे. कोहलीच्या डोक्यावर यावेळी मुकुटही ठेवण्यात आलेला आहे.
Web Title: ICC World Cup 2019 INDVSA: Super catch! If you see Virat's catch captured, then forget everything
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.