Join us  

ICC World Cup 2019 INDvSA : चहलचे चार बळी भारतासाठी नेहमीच ‘लकीे’ 

वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुध्द डावात चार किंवा अधिक बळी भारतातर्फे त्यानेच सर्वाधिक वेळा घेतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 7:38 PM

Open in App

ललित झांबरे : लेगस्पिनर युजवेंद्र चहलने वन डे सामन्यात ज्या ज्या वेळी चार बळी घेतले त्या त्या वेळी भारतीय संघ जिंकला आहे. साउदम्पटन येथे त्याने आजसुद्धा दक्षिण आफ्रिकेचे ४ गडी ५१ धावांत बाद केले. युजवेंद्रने कारकिर्दीत चार वेळा वन डे सामन्यात चार पेक्षा अधिक गडी बाद केले आहेत. त्यापैकी तीन वेळा त्याची ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुध्द आहे आणि वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुध्द डावात चार किंवा अधिक बळी भारतातर्फे त्यानेच सर्वाधिक वेळा घेतले आहेत.  अनिल कुंबळे, सुनील जोशी, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन वेळा दक्षिण आफ्रिकेविरुध्द चार किंवा अधिक बळी मिळवले आहेत.चहलने मिळवलेले चार किंवा अधिक बळी५/२२  वि. द.आ.- सेंच्युरियन  २०१८ -भारत ९ गड्यांनी विजयी४/४६ वि. द.आ.- केपटाऊन   २०१८- भारत १२४ धावांनी विजयी६/४२ वि. आॅस्ट्रे.- मेलबोर्न      २०१९- भारत ७ गड्यांनी विजयी४/५१ वि. द.आ.- साऊदम्पटन २०१९--------------------------.

टॅग्स :युजवेंद्र चहलवर्ल्ड कप 2019