लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला सोमवारी बेभरवशी पाकिस्तान संघाकडून पराभव पत्करावा लागला. 348 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला 9 बाद 334 धावाच करता आल्या. जो रूट आणि जॉस बटलर यांची शतकी खेळी नंतरही इंग्लंडला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. या जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर इंग्लंड संघाला मंगळवारी आणखी दोन धक्के बसले. त्यांचा सलामीवीर जेसन रॉय आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला 348 धावांचा पल्ला गाठून दिला. मोहम्मद हफिज ( 84), बाबर आजम ( 63), सर्फराज अहमद ( 55), इमाम उल हक ( 44) आणि फखर जमान ( 36) यांनी दमदार खेळ केला. त्याच्या प्रत्युत्तरात जो रूट व जॉस बटलर यांनी शतकी खेळी केल्या. कर्णधार इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स आणि जेसन रॉय यांना अपयश आले. रूट व बटलर यांच्या शतकानंतरही इंग्लंडला 9 बाद 334 धावांपर्यंतच मजल मारता आली.
या सामन्यात आयसीसीच्या आचारसंहितेतील पहिल्या स्तराच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे जेसन रॉयला त्याच्या सामना मानधनातील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. पाकिस्तानच्या डावातील 14व्या षटकात क्षेत्ररक्षणात चूक झाल्यावर रॉयने आक्षेपार्ह टिपणी केली होती. आर्चररलाही त्याच्या मानधनातील 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. 27व्या षटकात त्यानेही आक्षेपार्ह हावभाव केले होते.
पाकिस्तान कर्णधार व खेळाडूंना दंड
या सामन्यांत षटकांचा वेग कमी राखल्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला 20 टक्के, तर अन्य खेळाडूंना 10 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
वर्ल्ड कपमध्ये असं प्रथमच घडलं, इंग्लंडच्या नावावर 'हा' लाजिरवाणा विक्रमवेस्ट इंडिजकडून पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी कमाल केली. बेभरवशी पाकिस्तान संघाने यजमान इंग्लंडला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक 6 वेळा 300+ धावा करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली, परंतु त्याचवेळी एक लाजिरवाणा विक्रमही नावावर केला. या सामन्यात इंग्लंडला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. रूट व बटलर यांच्या शतकानंतरही इंग्लंडला 9 बाद 334 धावांपर्यंतच मजल मारता आली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात दोन फलंदाजांनी एकाच डावात शतक झळकावूनही पराभूत होणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला.
Web Title: ICC World Cup 2019 : Jason Roy and Jofra Archer had been fined match fee for breaching Level One of the ICC Code of Conduct during England vs Pakistan match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.