लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडचा भरवश्याचा फलंदाज जो रूटने एक धाव न करताही वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड नेमका आहे तरी काय, ते जाणून घ्या...
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २२३ धावांवर रोखले. या सामन्यात रूटने पॅट कमिन्सचा एक झेल पकडला. हा झेल पकडत रुटने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. कारण एका विश्वचषकात सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम रुटच्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर होता. पॉन्टिंगने २०१३ साली झालेल्या विश्वचषकात ११ झेल पकडले होते. या विश्वचषकात रुटने १२ झेल पकडल्या आहेत.
अॅलेक्स केरीच्या जबड्यावर चेंडू आदळला अन् रक्त वाहू लागले
इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि नव्यानं ताफ्यात दाखल झालेला पिटर हँड्सकोम्ब यांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयश आले. ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी ऑसींना धक्के देत त्यांची अवस्था 3 बाद 14 अशी केली. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि अॅलेक्स केरी यांनी खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला. डावाच्या आठव्या षटकात ऑसींना आणखी एक मोठा धक्का बसता बसता राहीला.
आर्चरने टाकलेल्या आठव्या षटकातील उसळी घेणारा चेंडू केरीच्या जबड्यावर आदळला आणि त्याला दुखापत झाली. चेंडूचा वेग इतका होता की केरीच्या जबड्यावरील कातडी सोलली गेली अन् रक्त वाहू लागलं. केरीच्या जबड्यातून वाहणारं रक्त पाहून ऑसींच्या गोटात चिंता पसरली होती. केरीला तातडीनं वैद्यकीय मदत करण्यात आली. जबड्यावर पट्टी लावून त्यानंतर केरी मैदानावर खेळत राहिला.
निसर्गावर प्रभुत्व गाजवणे माणसाच्या हातात नसल्याने पावसाच्या व्यत्ययामुळे न्यूझीलंडचा डाव जवळपास संपल्यासारखा असताना विश्वचषकाचा उपांत्य सामना रोखावा लागला. पावसापासून बचाव करण्यासाठी मैदान केवळ अंशता का झाकण्यात आले हे समजण्यापलिकडचे होते. इंग्लंड असा देश आहे की जेथे सर्व काही शक्य आहे. येथील नागरिक कुठल्याही बाबींवर भाष्य करतात. जगावर अद्याप आमचेच राज्य असल्याचा त्यांचा समज आहे. पावसानंतर इतर देशांत खेळ रद्द झाला असता, तर साधने उपलब्ध नसताना विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा कशी काय देण्यात आली, असा प्रश्न विचारला असता.
Web Title: ICC World Cup 2019: Joe Root clinches World Record...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.