लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाची सुरुवात धडाक्यात झाली. पहिल्याच षटकात इम्रान ताहिरने इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवला आऊट केले. पण विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात, पहिल्याच षटकात बाद झालेला बेसरस्टोव हा काही पहिला फलंदाज नाही.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावून चांगला डाव खेळला. त्यात आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने पहिलेच षटक फिरकीपूट इम्रान ताहीरच्या हातात चेंडू देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या सामन्याची सुरुवात एका फिरकीपटूने केली. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू असलेल्या ताहीरने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्याने पहिल्याच षटकात इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला माघारी पाठवत वर्ल्ड कपमधील पहिली विकेट घेतली.
विश्वचषकाच्या पहिल्याच षटकात बाद होणारा बेअरस्टो हा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशीच एक घटना 1992 साली घडली आहे. 1992 साली ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक खेळवला गेला. त्यावेळी पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होता. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाचा क्रेग मॅकडरमॉट पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होता. आणि पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचे माजी सलामीवीर जॉन राइट यांना बाद केले होते. जॉन हे भारताचे प्रशिक्षकही राहिले आहेत.
Web Title: ICC World Cup 2019: Jonny Bairstow is second player who out in the first over of wc
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.